होवित्झर तोफेच्या उत्पादनासाठी गुजरातमध्ये L&Tच्या निर्मिती केंद्राचे उद्घाटन 
हजिरा (गुजरात) येथे उभारण्यात आलेल्या लार्सन अॅण्ड टुब्रो या बहुराष्ट्रीय कंपनीच्या आर्मर्ड सिस्टीम्स कॉम्प्लेक्स या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.


हा देशातला प्रथम खासगी प्रकल्प आहे, जेथे के-9 वज्र सेल्फ-प्रोपेल्ड होवित्झर तोफेचे निर्मिती केली जाईल. भारतीय लष्कराला ‘के-9 वज्र-टी 155 मि.मी./52 कॅलिबर ट्रॅक्ड सेल्फ-प्रोपेल्ड गन सिस्टम’ याच्या 100 एककांचा पुरवठा करण्यासाठी कंपनीशी करार झाला आहे. 

हा 4,500 कोटी रूपयांचा करार भारत सरकारच्या “मेक इन इंडिया” या उपक्रमाच्या अंतर्गत करण्यात आला आहे.शिवाय तोफेच्या निर्मितीसाठी लार्सन अँड टुब्रो कंपनीने दक्षिण कोरियाच्या हानव्हा कॉर्पोरेशन या कंपनीसोबत तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाविषयीचा करार केला.AIIMSची नवी पद्धत नवजात बालकांमधील सेप्सिसचा झटका येण्याचा 12 तासांपूर्वीच आगाऊ अंदाज बांधू शकते
थर्मल इमेजिंग या तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवजात बालकांमध्ये दिसून येणारा सेप्सिसचा झटका अगोदरच ओळखण्यासाठी अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (AIIMS) समुहाच्या संशोधकांनी एक मशीन-लर्निंग अल्गोरिदम तयार केले आहे, ज्याची अचूकता 75% पर्यंत आहे.

सेप्सिसचा झटका (Sepsis shock) म्हणजे शरीरामधील मुख्य अवयवांना रक्ताचा आणि ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाल्यामुळे मृत्यू होण्याची परिस्थिती उद्भवणे असा होतो. या परिस्थितीला वैद्यकशास्त्रात ‘सेप्सिस’ असे म्हणतात.

या पद्धतीमुळे वर्तमानातल्या गोल्ड स्टँडर्ड (इंट्रा-आर्टेरियल रक्तदाब) याचा वापर करुन चिकित्सक प्रयोगशाळेमधील चाचणीतून ओळखल्या जाऊ शकल्याच्या 12 तासांपूर्वीच अश्या झटक्यांना ओळखणे शक्य आहे.

भारतात जन्मलेल्या बाळाच्या ICUमध्ये, 70-90% बाळांमध्ये ‘सेप्सिस’चे चिन्ह विकसित होते. बहुतेक 30% बाल-रुग्ण सेप्सिसपासून ग्रस्त असतात आणि 30% बहू-अवयव कार्य करण्यास अपयशी ठरल्यामुळे मरतात.


कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संशोधनामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर
भारताच्या ‘इतिहास’ या संशोधक संस्थेनी केलेल्या एका अभ्यासानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या क्षेत्रात प्रकाशित होणार्‍या उच्च दर्जाच्या संशोधनात्मक प्रकाशनांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

2013 ते सन 2017 या काळात AI संबंधित संशोधनात्मक प्रकाशनांच्या संख्येच्या बाबतीत चीन (37,918) हा देश प्रथम स्थानी आहे. यानंतर द्वितीय स्थानी अमेरिका (32,421) आणि त्यानंतर भारत (12,135) आहे.

मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकांमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचा संदर्भ घेतला गेला अश्या बाबतीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. याबाबतीत अग्रस्थानी असलेले देश म्हणजे अनुक्रमे ब्रिटन, कॅनडा, अमेरिका आणि चीन हे आहेत. 

AIच्या क्षेत्रात कार्य करणारे केवळ 50 ते 75 प्रमुख संशोधक भारतात आहेत, जे मुख्यताः IIT, IIIT अश्या संस्थांमध्ये आहेत.‘खेलो इंडिया युथ गेम्स 2019’मध्ये महाराष्ट्र अव्वल
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे पुणे शहरात आयोजित केल्या गेलेल्या ‘खेलो इंडिया युथ गेम्स 2019’ची सांगता झाली आणि स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद महाराष्ट्राच्या संघाने पटकाविले आहे.

स्पर्धेच्या पदकतालिकेत हरियाणाला स्पर्धेचा द्वितीय आणि दिल्लीच्या संघाला तृतीय क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्र संघाचे पथकप्रमुख विजय संतान यांसह खेळाडूंनी विजेतेपदाचा करंडक स्वीकारला.

महाराष्ट्राच्या संघाने या खेळांमध्ये एकूण 228 पदकांची (85 सुवर्ण) कमाई केलेली आहे. तर हरियाणाने 176 (62 सुवर्ण) व दिल्लीने 136 पदकांची (48 सुवर्ण) कमाई केली.