गोव्यात मांडवी नदीवरील ‘अटल सेतू’ या पूलाचे उद्घाटन
गोव्यात मांडवी नदीवर बांधण्यात आलेल्या 5.1 किलोमीटर लांबीच्या ‘अटल सेतू’चे उद्घाटन करण्यात आले आहे.


हा पूल राजधानी शहर पणजीमध्ये प्रवेश करण्यास सुलभता आणणार आहे. चार पदरी पूलाचे बांधकाम गोवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (GIDC) आणि लार्सन अँड टुब्रो यांनी केले.



कोचीत ‘इंटिग्रेटेड रिफायनरी एक्सपांशन प्रोजेक्ट कॉम्प्लेक्स’ (IREP) उभारले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळ राज्याच्या कोची शहरात उभारण्यात आलेल्या ‘इंटिग्रेटेड रिफायनरी एक्सपांशन प्रोजेक्ट कॉम्प्लेक्स’ (IREP) याचे राष्ट्रार्पन करण्यात आले आहे.

या प्रकल्पामुळे कोचीचा तेलशुद्धीकरण प्रकल्प जागतिक दर्जाचे मानदंड पूर्ण करणारा जगातील सर्वात मोठा सरकार-प्रायोजित सार्वजनिक तेलशुद्धीकरण प्रकल्प बनणार. यामुळे LPG आणि डिझेलचे उत्पादन दुप्पट होईल.

भारत हा जगातला तिसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल ग्राहक असून, आपल्या एकूण ऊर्जा गरजांपैकी 80% तेल आयात करतो आणि मागणीत वाढ करण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहे. 

देशाची कच्चे तेल इंधनामध्ये बदलण्याची क्षमता वार्षिक 247.6 MT इतकी आहे. या प्रमाणात वाढ झाल्यास ही क्षमता 2025 सालापर्यंत 414.35 MT आणि 2030 सालापर्यंत 438.65 MT पर्यंत वाढेल. वर्तमान तेलशुद्धीकरण क्षमता वर्ष 2016-17 मध्ये 193.74 MT सह मागणीपेक्षा अधिक आहे, परंतु आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (IEA) अंदाजानुसार ही मागणी 2040 सालापर्यंत 458MT होईल.



भारताच्या ‘ट्रेन 18’ गाडीला ‘वंदे भारत एक्सप्रेस’ नाव दिले
भारताच्या इंजिन नसलेल्या ‘ट्रेन 18’ याला ‘वंदे भारत एक्सप्रेस’ हे नवे नाव देण्यात आले आहे

17 नोव्हेंबर 2018 रोजी उत्तरप्रदेशात बरेली-मोरादाबाद या मार्गावर भारताच्या पहिल्या इंजिन नसलेल्या ‘ट्रेन 18’ या रेलगाडीची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली होती. ही गाडी नवी दिल्ली आणि वाराणसी या दोन शहरांमध्ये धावणार आहे.

इंजिन नसलेली सेमी-हायस्पीड ‘ट्रेन 18’ ही गाडी भारताच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीने तयार केली आहे आणि राजधानी ट्रेन नंतर पहिल्यांदाच अशी ट्रेन सेवेत आणली गेली.

ही रेलगाडी सेल्फ-प्रोपल्शन मॉड्यूलद्वारे चालणारी असून संपूर्णपणे वातानुकूलित ट्रेन आहे. ही ताशी 160 किलोमीटर वेगाने धावू शकते. 100 कोटी रुपये खर्चून तयार केलेली 16 डब्ब्यांची ही रेलगाडी स्वतंत्र लोकोमोटिव्ह किंवा इंजिन शिवाय असलेली प्रथम दीर्घ-मार्गिकेची रेलगाडी ठरणार आहे.


ITBP ने आठव्या राष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धेचे जेतेपद जिंकले
जम्मू व काश्मीर राज्याच्या लद्दाख येथे 11,000 फूट उंचीवर खेळल्या गेलेल्या ‘राष्ट्रीय आइस हॉकी अजिंक्यपद 2019’ स्पर्धेचे जेतेपद इंडो-तिबेटी सीमा पोलीस (ITBP) दलाने जिंकले आहे.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंडो-तिबेटी सीमा पोलीस (ITBP) दलाच्या चमूने आर्मी संघाचा पराभव केला. या स्पर्धेचे आयोजन भारतीय आइस हॉकी संघ (IHAI) तर्फे केले जाते.



कार्तिक शर्माने न्यू साउथ वेल्स आर्मेचर गोल्फ स्पर्धेचे जेतेपद जिंकले
कार्तिक शर्माने ‘न्यू साउथ वेल्स पुरुष आर्मेचर गोल्फ अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे जेतेपद जिंकले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या टेरी हिल्स गोल्फ कंट्री क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत कार्तिकने ऑस्ट्रेलियाच्या नॅथन बार्बेरीला मागे टाकत विजय मिळविला. 



सायना नेहवालने इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली
भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने ‘इंडोनेशिया मास्टर्स 2019’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत सायना नेहवालची प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरिनला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे माघार घ्यावी लागली.

BWF वर्ल्ड टूर सुपर 500 ग्रेडची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे. 2010 साली पहिल्यांदा ही स्पर्धा खेळली गेली.