फेडरेशन इंटरनॅशनल दे फूटबॉल असोसिएशन (फ्रेंच: Fédération Internationale de Football Association) ही फुटबॉल खेळावर नियंत्रण ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना तिच्या फिफा या लघुरुपाने जास्त ओळखली जाते. 


झ्युरिक, स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय असणा-या या संघटनेची स्थापना २१ मे १९०४ रोजी पॅरिस, फ्रांस येथे झाली. 

जियानी इनफंटानी हे फिफाचे २०१९ साली अध्यक्ष आहेत. तर सलमान बिन इब्राहिम आलं खलिफा हे फिफाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. तर फातिमा समोरा या महासचिव आहेत.

फिफा ची सदस्य संख्या २११ इतकी आहे.

‘फॉर द गेम, फॉर द वर्ल्ड’ हे फिफाचे घोषवाक्य आहे.

फिफा ची मुख्य जवाबदारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणे आहे.


पुरुषांसाठी फिफा वर्ल्ड कप, ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धा, अंडर-२० विश्वचषक, अंडर-१७ विश्वचषक, अंडर १५ युवक ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धा, फुटसॉल फ़ुटबॉल विश्वचषक, बीच सॉकर विश्वचषक, फिफा क्लब वर्ल्ड कप, ब्लु स्टार्स कप या स्पर्धांचे आयोजन करते.

२०१८ सालचा फ़ुटबॉल वर्ल्ड कप फ्रान्स संघाने जिंकला. २०१६ साली फ़ुटबाँल ऑलिम्पिकमध्ये ब्राझीलने पदक जिंकले. २०१९ साली अंडर-२० विश्वचषक युक्रेन संघाने जिंकला. २०१७ अंडर-१७ विश्वचषक इंग्लंड संघाने जिंकला.

महिलांसाठी फिफा वर्ल्ड कप, ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धा, अंडर-२० विश्वचषक, अंडर-१७ विश्वचषक, अंडर १५ युवक ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करते.

२०१९ साली महिला फुटबॉल वर्ल्ड कप अमेरिकेने जिंकला. २०१६ साली महिला फ़ुटबाँल ऑलिम्पिकमध्ये जर्मनीने पदक जिंकले. २०१८ साली अंडर-२० महिला विश्वचषक जपान संघाने जिंकला. २०१८ अंडर-१७ महिला विश्वचषक स्पेन संघाने जिंकला.

फिफाच्या सहा उप संघटना आहेत
  1. AFC (Asian Football Federation) : आशियाई फुटबॉल संघटना
  2. CAF (Confederation of African Football) : आफ्रिकन फुटबॉल संघटना
  3. CONCACAF (Confederation of North, Central American and Carribean Association Football) : उत्तर व मध्यअमेरिका आणि कॅरेबियन फुटबॉल संघटना 
  4. CONMEBOL (South American Football Federation) : दक्षिण अमेरिकन फुटबॉल संघटना
  5. OFC (Oceania Football Federation) : ओसीयानिया फुटबॉल संघटना
  6. UEFA (Union of Europian Football Association) : युरोपियन फुटबॉल संघटना

फिफा विश्वचषक
फिफा विश्वचषक किंवा नुसताच विश्वचषक ही फुटबॉल खेळामधील एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. फिफा फुटबॉलची संस्था दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. 


ह्या स्पर्धेत जगातील ३२ देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर विश्वचषकाआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे ३२ संघ निवडले जातात. 

२०१८ विश्वचषक जिंकणारा फ्रांस हा सद्य विजेता देश आहे. आजवर खेळवण्यात आलेल्या १९ विश्वचषक स्पर्धांपैकी ब्राझिलच्या संघानं एकूण पाचवेळा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. 

याचसोबत जर्मनी आणि इटलीने प्रत्येकी ४ वेळा विश्वचषक जिंकला आहे तर उरुग्वे, फ्रान्स आणि अर्जेंटिनानं प्रत्येकी दोनवेळा फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. याव्यतिरीक्त इंग्लंडआणि स्पेननेही प्रत्येकी एकेक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. 

पुढील विश्वचषक स्पर्धांचे आयोजन २०२२ साली कतार हे देश करतील.स्पर्धेचा इतिहास
१९३० साली या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची सुरुवात झाली. फिफा ही फुटबॉल विश्वातील सर्वांत महत्त्वाची संघटना दर चार वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करते. १९४२ व १९४६ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीत या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या.

८८ वर्षांपूर्वी म्हणजेच १९३० साली फिफा विश्वचषकाला सुरुवात झाली. या ८८ वर्षांत झालेल्या २० फिफा विश्वचषकात आतापर्यंत केवळ आठच संघांना विजेतेपद मिळवता आलं आहे. 

पात्रता
दर विश्वचषकामध्ये खेळण्यासाठी सुमारे २०० राष्ट्रीय संघांमधून ३२ संघांची निवड केली जाते. ह्यासाठी फिफाने विश्वचषक पात्रता फेरी निर्माण केली आहे. 

यजमान देशाला आपोआप पात्रता मिळते परंतु उर्वरित ३१ जागांसाठी सर्व उत्सुक संघांना ही फेरी पार करावी लागते. फिफाच्या सदस्य खंडीय संघटनांमधून प्रत्येक विश्वचषकासाठी ठराविक संख्येचे संघ पात्र ठरू शकतात.