आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती – ICC

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती ही क्रिकेट ह्या खेळाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे.

१५ जून १९०९ रोजी इंग्लंड,  ऑस्ट्रेलिया आणि  दक्षिण आफ्रिका या देशांनी इंपेरियल क्रिकेट संघटनेची (Imperial Cricket Conference) स्थापना केली. 
१९६५ मध्ये या संघटनेचे नाव बदलून आंतररष्ट्रीय क्रिकेट सभा (International Cricket Conference) असे ठेवण्यात आले. १९८९पासून सध्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (International Cricket Council) उपयोगात आणले जात आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनचे १०४ सदस्य देश आहेत. आय.सी.सी. सामन्यांसाठी पंच व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करते.

Great Sport Great Spirit’ हे ICC चे घोषवाक्य आहे.
याचे मुख्यालय दुबई, (संयुक्त अरब अमिराती) येथे आहे.२०१९ साली आयसीसीचे चेअरमन भारतचे शशांक मनोहर आहेत.

सदस्य देश

सदस्य देश दोन विभागात विभागल्या गेलेले आहेत.
 • पूर्ण सदस्य – ११ देश
 • असोसियेट सदस्य – ९३ देश

ह्या परिषदेमध्ये सुरवातीला फक्त राष्ट्रकुलमधील देशांनाच सामिल होता येत होते. ह्या सदस्यांनंतर १९२६ मध्ये भारत, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज, आणि त्यानंतर १९५३ मध्ये पाकिस्तान सामील झाला.

१९६१ मध्ये, राष्ट्रकुलामधून बाहेर पडल्याने दक्षिण आफ्रिकेने सदस्यत्वाचा राजीनामा दिला.१९६५ मध्ये पहिल्यांदाच नियमन मंडळात राष्ट्रकुलाच्या बाहेरील देशांच्या निवडीला मंजूरी देण्याबाबत नवीन नियम केले गेले.
नियमन मंडळामध्ये नव्याने निवड झालेला कोणताही सदस्य फक्त सहयोगी (असोसिएट) सदस्य म्हणून निवड केला जातो ज्याला पुर्ण सदस्य होण्याची संधी असते. फिजी आणि अमेरिका हे सर्वात पहिले सहयोगी सदस्य होते.
१९८९ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नाव पुन्हा एकदा बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती असे केले गेले.
१९९१ मध्ये दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा पुर्ण सदस्य म्हणून निवडला गेला आणि १९९२ मध्ये झिम्बाब्वेची निवड.
सर्वात अलिकडील पुर्ण सदस्य अफगाणिस्तान आणि आयर्लंड, २०१७ साली नियुक्त केला गेला.सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीमध्ये एकूण १०४ सदस्य आहेत.
पुर्ण सदस्य हे देशातील किंवा सहयोगी देशातील क्रिकेट नियामक मंडळ असते. पुर्ण सदस्य हे एका भौगोलिक प्रदेशाचे प्रतिनिधी असू शकतात. सर्व पुर्ण सदस्यांना अधिकृत कसोटी सामने खेळण्यासाठी एक संघ पाठवण्याची मुभा असते.
त्याशिवाय, पुर्ण सदस्य असलेल्या देश हे आपोआपच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यास पात्र असतात
वेस्ट इंडीज संघ कोणत्याही एका देशाचे प्रतिनिधीत्व करत नाही तर कॅरिबियनप्रदेशातील एकूण २० देश आणि प्रदेशांचा एकत्रित संघ आहे. तसेच इंग्लंड क्रिकेट संघ हा इंग्लंड आणि वेल्सचे प्रतिनिधित्व करतो. सदस्य देशांची अधिकृत क्रमवारी दर्शवणारे संकेतस्थळ येथे आहे.

सहयोगी सदस्य देशांमध्ये त्या देशांचा समावेश होतो जे पूर्ण सदस्यत्व पात्र नाहीत परंतू जेथे क्रिकेटची घट्टपणे स्थापना झाली आहे आणि क्रिकेट संघटित आहे. सहयोगी सदस्यांमध्ये एकूण ९३ देशांचा सहभाग आहे.सर्व सहयोगी सदस्य आयसीसी विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा आणि आयसीसीद्वारा प्रशासित एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी पात्र असतात.

दर दोन वर्षांनी होणार्‍या आयसीसी विश्व ट्वेंटी२० (२०१८ पर्यंत, पुढील टी२० विश्वचषक २०१८ मध्ये होईल) साठीची पात्रता प्रक्रिया म्हणून आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता स्पर्धा घेतली जाते. पात्र संघाला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० चा दर्जा दिला जातो.

प्रादेशिक संघटना

प्रादेशिक संघटनांचे काम क्रिकेट स्पर्धाचे आयोजन, प्रोत्साहन व खेळाचा विकास वेगवेगळ्या देशात करणे आहे.
 • आशिया क्रिकेट संघटन
 • युरोप क्रिकेट संघ
 • आफ्रिका क्रिकेट संघटन
 • अमेरिका क्रिकेट संघटन
 • पुर्व आशिया-पॅसिफीक क्रिकेट संघ
महत्वाच्या स्पर्धा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन विविध एक दिवसीय, कसौटी, प्रथम श्रेणी व २०-२० सामन्यांचे आयोजन करते.
 • कसोटी सामने
  • आय.सी.सी. कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
 • प्रथम श्रेणी सामने
  • आय.सी.सी. इंटर कॉन्टीनेन्टल चषक
 • एक दिवसीय सामने
  • आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक
  • आय.सी.सी. एक दिवसीय अजिंक्यपद स्पर्धा
  • आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी
  • आय.सी.सी. अन्डर-१९ क्रिकेट विश्वचषक
  • आय.सी.सी. वर्ल्ड क्रिकेट लीग
  • आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने
 • २०-२० सामने
  • आय.सी.सी. २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा

क्रिकेट विश्वचषक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (ICC) दर चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन करते. कसोटी व एकदिवसीय सामने खेळणार्‍या देशाशिवाय ICC Trophy तील काही देश विश्वचषक स्पर्धेत सहभागी होतात.
१९७५ साली सर्व प्रथम एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन इंग्लंड मध्ये करण्यात आले. पहिल्या विश्वचषकात सहभागी झालेले संघ होते, ऑस्ट्रेलिया, ईंग्लंड, वेस्ट इंडीझ, भारत, पाकिस्तान, न्यू झीलँड (कसोटी खेळणारे संघ), श्रीलंका व पूर्व आफ्रिका.

विजेता यादी

१९७५ : वेस्ट इंडिज
१९७९ : वेस्ट इंडिज
१९८३ : भारत
१९८७ : ऑस्ट्रेलिया
१९९२ : पाकिस्तान
१९९६ : श्रीलंका
१९९९ : ऑस्ट्रेलिया
२००३ : ऑस्ट्रेलिया
२००७ : ऑस्ट्रेलिया
२०११ : भारत
२०१५ :ऑस्ट्रेलिया
२०१९ : इंग्लंड