संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद (UNCCD)

UNCCD – United Nations Convention to Combat Desertification.  संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद.

UN च्या रिओ परिषदेच्या ‘Agenda 21‘ या योजनेच्या शिफारसीप्रमाणे १७ जून १९९४ रोजी पॅरिस इथे UNCCD चा मसुदा तयार करण्यात आला. व १४ ऑक्टोबर १९९४ रोजी या मसुद्यावर स्वाक्षऱ्या झाल्या.

२६ डिसेंबर १९९६ रोजी ही संस्था कार्यरत झाली. वाळवंटीकरणाच्या समस्येला संबोधित करणारी जगातील ही एकमेव आंतरराष्ट्रीय संस्था आहे.बॉन, जर्मनी येथे UNCCD चे मुख्यालय आहे.यामध्ये १९६ देश व युरोपियन युनियन यांचा समावेश आहे.

वाळवंटीकरणाशी लढा देणे व राष्ट्रीय कृती कार्यक्रमाद्वारे दुष्काळाची तीव्रता कमी करणे तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य व भागीदारी द्वारे दीर्घकालीन रणनीती तयार करणे हा याचा उद्देश आहे.

२००६ हे वर्ष UN तर्फे ‘आंतरराष्ट्रीय वाळवंट व वाळवंटीकरण वर्ष’ घोषित करण्यात आले होते.

परिषदेच्या अंमलबजावणीचे कार्य Conference of Parties (COP) करते. COP हे UNCCD चे निर्णय घेणारे मंडळ आहे. १९९७ पासून २००१ पर्यंत COP चे सत्र दरवर्षी आयोजित करण्यात येत होते. मात्र २००१ पासून COP चे सत्र द्विवार्षिक पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.

COP चे आतापर्यंतचे सत्र 

COP १ : रोम (इटली) : १९९७
COP २ : दकर (सेनेगल) : १९९८
COP ३ : रेसिफे (ब्राझील) : १९९९
COP ४ : बॉन (जर्मनी) : २०००
COP ५ : जिनेव्हा (स्वित्झर्लंड) : २००१
COP ६ : हवाना (क्युबा) : २००३
COP ७ : नैरोबी (केनिया) : २००५
COP ८ : माद्रिद (स्पेन) : २००७
COP ९ : ब्युनोस इरेस (अर्जेन्टीना) : २००९
COP १० : चांगवोन (दक्षिण कोरिया) : २०११
COP ११ : विंढोक (नामिबिया) : २०१३
COP १२ : अंकारा (टर्की) : २०१५
COP १३ : ओरडोस सिटी (चीन) : २०१७
COP १४ : नवी दिल्ली (भारत) : २०१९