‘JIMEX 20’: भारत आणि जपान या देशांच्या नौदलांची द्विपक्षीय सागरी कवायती

भारत आणि जपान या देशांच्या नौदलांदरम्यान ‘JIMEX 20’ नामक द्विपक्षीय सागरी कवायती 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत उत्तर अरबी समुद्रात आयोजित करण्यात आली.

‘JIMEX’ या द्विपक्षीय सागरी कवायतीची ही चौथी आवृत्ती आहे. हा कार्यक्रम दोन्ही नौदलांमधला सहकार्य आणि परस्पर विश्वास वाढवण्यास आणि दोन्ही देशांमधले मैत्रीचे दीर्घकाळचे संबंध दृढ करण्यास मदत करणार आहे.

रिअर अ‍ॅडमिरल कृष्णा स्वामीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाकडून स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केलेले विनाशक ‘चेन्नई’ जहाज, ‘तरकश’ लढाऊ जहाज, ‘दीपक’ फ्लीट टँकर यांचा सहभाग आहे. जहाजांव्यतिरिक्त P8I हे सागरी गस्त विमान, एकात्मिक हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने कवायतीत सहभागी होणार आहेत.

सागरी सहकार्यावर लक्ष केंद्रीत करुन भारतीय नौदल आणि जपान मेरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स (JMSDF) यांच्या ‘JIMEX’ कवायती 2012 सालापासून आयोजित केली जात आहे.

माजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन

माजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे आज निधन झाले.

अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे त्यांनी भारताची सेवा केली.

कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली.

अक्किथम अच्युतन नंबुथिरी 55 व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी

प्रसिद्ध मल्याळी कवि अक्किथम अच्युतन नंबुथिरी यांचा 55 वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

मल्याळी साहित्यातले नामांकित व्यक्तित्व असलेले अक्किथम नंबुथिरी यांच्या नावावर 55 पुस्तके आहेत, त्यात 45 काव्यसंग्रह आहेत.

93 वर्षांचे अक्किथम नंबुथिरी यांना साहित्य अकादमी, पद्मश्री, कबीर यासहित देशातले बहुतेक सारे वाङ्मयीन पुरस्कार लाभले.

‘उन्नी नंबुद्री’ या मासिकाचे ते संस्थापक आहेत. याशिवाय, त्यांनी ‘आकाशवाणी’मध्ये दीर्घकाळ काम केले.

‘योगक्षेम सभा’ आणि ‘पलियम सत्याग्रह’ या दोन संस्थांमार्फत त्यांनी अनेक दशके सामाजिक कार्ये केलीत.

अणुशास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू यांचे निधन

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर बसू यांचे करोना संसर्गाने गुरुवारी कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.

वयाची 68 वर्षे पूर्ण केल्यानंतर तीनच दिवसांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. बसू यांना 2014 साली पद्मश्री उपाधीने गौरवण्यात आले होते.

‘आयएनएस अरिहंत’ या अणुऊर्जेवर चालणाऱ्या भारताच्या पहिल्या पाणबुडीसाठी अतिशय गुंतागुंतीची अणुभट्टी (रिअ‍ॅक्टर) तयार करण्याचेही ते प्रणेते होते.

2012 साली डॉ. बसू यांनी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे (बीएआरसी) संचालक म्हणून सूत्रे स्वीकारली.

तारापूर व कलपक्कम येथील ‘न्यूक्लियर रिसायकल प्लांट’ यांचा आराखडा, बांधकाम व संचालन यामागे प्रामुख्याने त्यांचीच प्रतिभा होती.

“पॅसेज एक्सरसाईज” (PASSEX)

पूर्व हिंद महासागर प्रदेशात 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय नौदल आणि ऑस्ट्रेलियाचे रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही यांच्यामधला संयुक्त “पॅसेज एक्सरसाईज” (PASSEX) नामक सागरी सराव आयोजित करण्यात आला.

दोन्ही नौदलांच्या दरम्यान होणाऱ्या कार्यात सुसूत्रबद्धता राखणे, एकमेकांना समजून घेणे तसेच सुयोग्य पद्धतीना आत्मसात करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.

सरावात भारतीय नौदलाच्या INS सह्याद्री आणि INS कर्मुक या जहाजांनी भाग घेतला होता.

‘पृथ्वी’ बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी

स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने (एसएफसी) आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) डिझाइन केलेले कमी पल्ल्याच्या ‘पृथ्वी’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (पृथ्वी शॉर्ट-रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र) यशस्वी चाचणी केली.

ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

या क्षेपणास्त्राने एसएफसीने ठरवलेल्या आपल्या मोहिमेचा प्रत्येक उद्देश पूर्ण केला.

पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे.

350 किलोमीटरपर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आयटीआरच्या परिसर-3 मध्ये मोबाईल लाँचरद्वारे सोडण्यात आलं.

आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिन: 19 सप्टेंबर 2020

दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा तिसरा शनिवार हा दिवस “आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिन” म्हणून जगभरात साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 19 सप्टेंबर 2020 रोजी साजरा करण्यात आला.

लाल पांडा या सस्तन प्राण्याच्या संवर्धन समस्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने या दिवसाची स्थापना करण्यात आली आहे.

रेड पांडा नेटवर्क या आंतरराष्ट्रीय मिशनच्या पुढाकाराने 2010 साली “आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिन”ची स्थापना करण्यात आली होती.

2007 साली नेपाळमध्ये ब्रायन विल्यम्स यांनी रेड पांडा नेटवर्क या संस्थेची स्थापना केली होती. लाल पांडा यांचे रक्षण तसेच त्यांचे अधिवास संरक्षित करण्याच्या प्रयत्नात ही संस्था जागतिक पातळीवर अग्रणी भूमिका बजावते.

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन

ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले.

ते 59वर्षांचे होते. IPLमधील एक प्रसिद्ध समालोचक म्हणून भारतीय चाहते जोन्स यांना ओळखायचे.

नव्या दमाच्या प्रतिभावान खेळाडूंना शोधणे आणि त्यांच्यातून तरुण नवे क्रिकेटर्स तयार करणे हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं.

‘अभ्यास’ ड्रोनची उड्डाण चाचणी यशस्वी

22 सप्‍टेंबर 2020 रोजी ‘अभ्यास’ नामक हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (HEAT) म्हणजेच एका ड्रोनची उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.

संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्यावतीने (DRDO) ओडिशा राज्यात ही चाचणी घेण्यात आली. यावेळी दोन निदर्शक वाहनांची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

विविध क्षेपणास्त्र यंत्रणेचे मूल्यांकन करण्यासाठी लक्ष्य म्हणून ‘अभ्यास’चा उपयोग केला जाऊ शकतो.

उड्डाणासाठी यात जुळे अंडरलंग बूस्टरचा वापर करण्यात आला आहे. लहान गॅस टर्बाइन इंजिनाच्या मदतीने ते उडते.

वाहनात मार्गदर्शन आणि नियंत्रणासाठी फ्लाइट कंट्रोल कंम्प्यूटर (FCC) सोबतच MEMS आधारित इनर्शल नेव्हिगेशन सिस्टिम (INS) बसविण्यात आले आहे.

वाहनाच्या उड्डाणाचे ‘प्रोग्रॅमिंग’ स्वतंत्रपणे केले जाऊ शकते. तसेच वाहनाची सर्व कार्यप्रणाली लॅपटॉपच्या मदतीने GSAवरून संचालित केली जाऊ शकते.

‘अभ्यास’ची रचना आणि विकास DRDOच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट ईस्टॅब्लिशमेंट (ADE) या केंद्राने केले.

शिवांगी सिंह ‘राफेल’च्या पहिल्या महिला फायटर पायलट

अलीकडेच ‘राफेल’ या अत्याधुनिक फायटर विमानांचा इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समावेश झाला.

‘गोल्डन अ‍ॅरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेलच्या पहिल्या स्क्वार्डनमध्ये एका महिला फायटर पायलटचा समावेश करण्यात आला आहे.

फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह असे या महिला फायटर पायलटचे नाव आहे.

शिवांगी सिंह 2017 साली इंडियन एअर फोर्सच्या सेवेत रुजू झाल्या. त्या दुसऱ्या बॅचमधील फायटर पायलट आहेत.

त्या लवकरच अंबाला स्थित ‘गोल्डन अ‍ॅरो’ च्या 17 व्या स्क्वार्डनच्या भाग होतील.

तामिळनाडूमध्ये भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार

तामिळनाडू राज्याच्या थाटी जिल्ह्यात बोडी वेस्ट हिल्सच्या परिसरात भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार आहे.

तिथे पृथ्वीच्या वातावरणात तयार होणाऱ्या न्यूट्रिनो कणांचे निरीक्षण केले जाणार. त्याद्वारे न्यूट्रिनो कणांच्या गुणधर्मांबद्दल अधिक माहिती गोळा केली जाणार.

‘न्यूट्रिनो डिटेक्टर’ हे एक ‘मॅग्नेटाईज्ड आयर्न कॅलोरीमीटर’ उपकरण असते. कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक वजनी उपकरण तयार केले जाणार आहे.

वेधशाळा जमिनीच्या खाली तयार केली जाणार आहे.

प्रकल्पाला अणुऊर्जा विभाग आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग वित्तपूरवठा करणार आहेत.

न्यूट्रिनो हे ब्रह्मांड तयार करणारे आकाराने सर्वात छोटे कण असतात. न्यूट्रिनो नावाप्रमाणेच विद्युतदृष्ट्या तटस्थ असतात आणि त्याचे वस्तुमान इतर कोणत्याही ज्ञात कणांपेक्षा शून्यसमान अगदीच कमी असते.

सूर्य आणि पृथ्वीचे वातावरण ही न्यूट्रिनो कणांचे मुख्य स्रोत आहेत.

न्यूट्रिनो वेधशाळा कॅनडा, जापान आणि इटली या देशांमध्ये जमिनीखाली तर अंटार्क्टिका व फ्रान्स या देशांमध्ये समुद्राखाली आहेत.

10 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या रीता शेर्पा यांचे निधन

जगातील सर्वाधिक उंचीचे एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारे नेपाळचे पहिले गिर्यारोहक आंग रीता शेर्पा यांचे निधन झाले आहे.

रीता यांनी आपल्या आयुष्यामध्ये ऑक्सिजन सिलिंडरशिवाय 10 वेळा एव्हरेस्टचे शिखर सर केले. सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम बराच काळ त्यांच्या नावावर होता.

या विक्रमासाठी 2017 मध्ये गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचा समावेश झाला होता.

रीता यांचे वयाच्या 72व्या वर्षी निधन झालं.

एकदाही त्यांनी ऑक्सिजन सिलिंडरचा वापर केला नव्हता. त्यांचे सहकारी त्यांच्या याच क्षमतेमुळे त्यांना ‘स्नो लेपर्ड’ म्हणजेच बर्फाळ प्रदेशातील चित्ता या नावाने ओळखायचे.

त्यांनी 1993 साली पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केला.

‘अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक 2020’ राज्यसभेत मंजूर

संसदेच्या राज्यसभेत ‘अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक 2020’ याला मंजूरी देण्यात आली आहे. लोकसभेत 15 सप्टेंबर 2020 रोजी हे विधेयक मंजूर झाले.

कडधान्य, डाळी, तेलबिया खाद्यतेल, कांदे आणि बटाटे यासारख्या वस्तू अत्यावश्यक वस्तू सेवा कायद्यातून वगळण्याची तरतूद या विधेयकात आहे. म्हणजेच त्यावरील नियामक संस्थाचे नियंत्रण दूर होणार.

या विधेयकाने 1955 सालाच्या कायद्यात दुरुस्ती केली जाणार.

युद्ध, दुष्काळ, अनावश्यक भाववाढ, निसर्गाचा प्रकोप अशा अनियमित परिस्थितीत धान्य पुरवठ्याबाबत नियंत्रण आणले जाणार आहे. मात्र संबंधितांनी मूल्य साखळीत केलेली गुंतवणूक आणि निर्यातीसाठी नोंदवलेली मागणी ह्या गोष्टींना अशा प्रसंगी साठा करण्याच्या मर्यादेतून वगळले जाणार, जेणेकरून या क्षेत्रात येणाऱ्या गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळणार.

आयएनएस विराट या युद्धनौकेचा अखेरचा प्रवास

जगात सर्वात जास्त सेवा केलेल्या आयएनएस विराट या युद्धनौकेचा अखेरचा प्रवासही संपला असून ती मुंबईहून गुजरातमधील अलंग येथे पोहोचली असल्याचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

भारतीय नौदलात 1987 मध्ये सामील करण्यात आलेली ही युद्धनौका श्रीराम ग्रुपकडून यावर्षी जुलैत 38.54 कोटी रुपयांना घेण्यात आली आहे.

आयएनएस विराट ही जगातील सर्वाधिक काळ सेवा केलेली युद्धनौका असून ती सेंटॉर वर्गातील दुसरी विमानवाहू युद्धनौका होती.

29 वर्षे ती नौदलाच्या सेवेत होती व मार्च 2017 मध्ये ती सेवेतून बाद करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय शांती दिन: 21 सप्टेंबर

दरवर्षी 21 सप्टेंबर या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात ‘आंतरराष्ट्रीय शांती दिन’ साजरा केला जातो. 2020 साली हा दिवस ‘शेपिंग पीस टुगेदर’ या संकल्पनेखाली पाळण्यात आला.

संयुक्त राष्ट्रसंघ महासभेनी (UNGA) 1981 साली आंतरराष्ट्रीय शांती दिनाची स्थापना केली. दोन दशकानंतर, 2001 साली महासभेनी हा दिवस अहिंसा आणि युध्दबंदीचा कालावधी म्हणून पाळण्याचे एकमताने मान्य केले.