भारतीय बँकिंग क्षेत्राचा विकास

 

भारतात बुध्द काळात श्रेष्ठी म्हणजे तत्कालीन बँकाच होय.
कौटिल्याने सुद्धा व्याज दराचा उल्लेख केला आहे.

मोगल काळात धातू चलन बँक व्यवसाय भरभराटीस आला परंतु शास्त्रीय पध्दत नव्हती.
अठराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःचा बँकिंग व्यवसाय सुरु केला. कंपनी मुंबई आणि कोलकाता येथे एजन्सी हाउसची स्थापना केली. परंतु त्यांना स्वतःचे भांडवल नव्हते.

भारतातील प्रथम बँक युरोपीयन बँकिंग पध्दतीवर आधारीत विदेशी भांडवलाच्या आधारे अँलेक्झांडर अँन्ड कंपनीद्वारे १७७० मध्ये कोलकाता येथे बँक ऑफ हिंदुस्थानची स्थापना करण्यात आली.

१७८८ मध्ये बेंगॉल बँक व जनरल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.
खाजगी भागधारकांनी एकत्र येवून १८०६ मध्ये बँक ऑफ बेंगॉल, १८४० मध्ये बँक ऑफ मुंबई, १८४३ मध्ये बँक ऑफ मद्रास या तीन इलाखा बँकांची स्थापना करण्यात आली.
१८६५ साली अलाहाबाद बँक
१८८१ अलायन्स बँक ऑफ शिमला
१९०१ पिपल्स बँक ऑफ इंडिया

भारतीय लोकांनी संचलित केलेली प्रथम बँक म्हणजे १८८१ मध्ये स्थापन झालेली अवध कमर्शियल बँक होय.
१८९४ मध्ये स्थापन झालेली पंजाब नॅशनल बँक ही पुर्णरुपाने प्रथम भारतीय बँक होय. सध्या अस्तित्वात असलेली सर्वात जुनी बँक पंजाब नॅशनल बँकच होय.

१९ व्या शतकाच्या तुलनेने २० शतकात प्रामुख्याने १९०६ नंतर भारतीय बँकाचा
१९१७ मध्ये उद्योजकांना उद्योगासाठी वित्तीय मदत करण्यासाठी टाटा औद्योगिक बँकेची स्थापना करण्यात आली.

शेड्यूल्ड व्यापारी बँक (अनुसूचीत बँक):- ज्या बँकांचा सामावेश आरबीआयच्या कायद्याच्या दुस-यावर सूचीत केला जातो व व्यापारी बँकांच्या मुदती ठेवी ५ लाखाच्या वर आहे अशा बँकांना आरबीआय शेड्युल्ड बँकेचा दर्जा देते.

नॉन शेड्यूल्ड बँक (अनअनुसूचीत):- ज्या बँकाचा सामावेश आरबीआयच्या कायद्याच्या दुस-या सूचीत केला जात नाही त्यांना नॉन शेड्यूल्ड बँका म्हणतात.

भारतीय बँकाची प्रगती (जुन २००९ पर्यंत)

अ.क्र. बँक एकुण शाखा ग्रामिण शाखा (%)

१. स्टेट बँक व सहयोगी बँका १६२९४ ५६१९ (३४.४९)

२. राष्ट्रीयीकृत बँका ३९७०३ १३४२५ (३३.८१)

३. प्रादेशिक ग्रामीण बँका १४८५१ ११६४४ (७६.६१)

एकुण सा. क्षेत्रातील बँका ७११९६ ३०६८८ (४३.१)

४. इतर अनुसूचीत बँका ८९७९ ११२६ (१२.५४)

५. परकीय अनुसूचीत बँका २९५ ४ (१.३६)

सर्व अनुसूचीत बँका ८०४७० ३८८१८ (३९.५४)

६. बिगर अनुसूचीत बँका ४४ ११ (२५)

एकुण व्यापारी बँका ८०५१४ ३१८१८ (३९.५३)

अनुसूचीत व बिगर अनुसूचीत बँका

RBI कायदा, 1934 या कायद्यान्वये व्यापारी बँकांचे वर्गीकरण दोन प्रकारात केले जाते.

1. अनुसूचीत बँका

2. बिगर अनुसूचीत बँका

1. अनुसूचीत बँका –

ज्या बँकांचा समावेश RBI कायदा, 1934 च्या दुसर्‍या अनुसूचीमध्ये करण्यात आला आहे, त्यांना अनुसुसूचित बँका असे म्हणतात.

निकष –

· त्या बँकेचे भाग भांडवल व राखीव निधी 5 लाख रुपयांपेक्षा कमी नसणे.

· त्या बँकेचे सर्वसाधारणपणे आपल्या ठेवीदारांच्या हितासाठी काम करावे

सुविधा –

· अशा बँकांतील खात्यांना सुरक्षितता व पत-मूल्य प्राप्त होते.

· या बँका RBI कडून बँक दराने कर्ज मिळविण्यास प्राप्त ठरतात.

· या बँकांना RBI कडून पुनर्वित्ताच्या सोयी प्राप्त होतात.

· या बँकांना RBI कडून प्रथम दर्जाच्या विनिमय पत्रांच्या पुनर्वटवणीच्या सोयी प्राप्त होतात.

· या बँकांना आपोआप निरसन गृहाचे सदस्यत्व मिळते.

बंधने –

· CRR व SLR चे बंधन

· प्रत्येक बँकेला आपल्या आठवड्याचा अहवाल दर शुक्रवारी RBI कडे पाठवावा लागतो.

· RBI कडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या सर्व निर्देशांचे पालन त्यांना करावे लागते.

बँकांचा समावेश –

1. SBI व तिच्या सहभागी बँका

2. राष्ट्रीयीकृत बँका

3. प्रादेशिक ग्रामीण बँका

4. भारतीय खाजगी अनुसूचीत बँका

5. परकीय बँका राज्य सहकारी बँका

2. बिगरअनुसूचीत बँका

· ज्या बँकांचा समावेश RBI कायदा-1934 च्या दुसर्‍या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला नाही त्यांना बिगर अनुसूचीत बँका असे म्हणतात.

· या बँकांना RBI च्या कर्ज, पुनर्वित्त, विनिमय पत्रांची पुनर्वटणी इत्यादी सोयी प्राप्त होत नाही.

· मात्र या बँकांना RBI ची काही बंधने लागू पडतात

बँकांचा समावेश –

1. भारतीय खाजगी बिगर अनुसूचीत बँका

2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका

3. प्राथमिक सहकारी पतसंस्था

व्यापारी बँकांची कार्य

· व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्विकारून त्याच ठेवीतुन गरजू लोकांना कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात.

· बँक ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावते.

1. प्राथमिक कार्य – ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच त्यांना बँकेची आम्ल चाचणी कार्य मानली जातात.

A. ठेवी स्विकारणे-

1. मागणीदेय ठेवी/चालू ठेवी –

1. ज्या ठेवीचे पैसे मागणी करताच परत द्यावे लागतात त्यांना मागणीदेय ठेवी म्हणतात.

2. खात्यातून केव्हाही व कितीही रक्कम काढता व ठेवता येते.

3. खात्यावर धांनादेशाची सोय असल्यास त्यादवारे व्यवहार केला जाऊ शकतो

2. मुदत ठेवी –

1. या ठेवीत एक विशिष्ट मुदतीसाठी पैसे ठेवले जातात.

2. मुदत संपल्याशिवाय पैसे देण्याचे बंधन बँकेवर नसते.

3. मुदतपूर्व पैसे हवे असल्यास दंडात्मक व्याजदर आकारून ते पैसे दिले जातात.

3. समिश्र ठेवी/बचाव ठेवी –

1. मागील देय व मुदत ठेवींच्या अटींचे एकत्रीकरण

2. यात केव्हाही व कितीही पैसे ठेवता येतात मात्र पैसे काढण्यावर बंधन असतात.बचत बँका अल्पावधीसाठी गुंतऊ शकतात, म्हणून बँका त्यावर अल्पदराने व्याज ठेवतात.

4. आवर्ती ठेवी –

1. दरमहा ठराविक रक्कम विशिष्ट मुदतीपर्यंत भरल्यास मुदतीअखेर व्याजासह ठेवी परत मिळते.

2. ठेवी-रक्कम दर महिन्याला वाढत जाते.

3. ठेवीवर बचत खात्यांपेक्षा जास्त मात्र मुदत ठेवीपेक्षा कमी दराने व्याज मिळते.

B. कर्ज व अग्रिमे देणे

· बँका जमा केलेल्या ठेवींमधून निरनिराळ्या पद्धतीने कर्ज व अग्रिमे देतात व स्वतःसाठी नफा कमवितात.

· ठराविक मुदतीसाठी कर्ज दिले तर त्याला कर्ज व अग्रिमे म्हणतात.

1. रोख पत रोख कर्ज

2. अधिकर्ष सवलत

3. तारणमूल्याधारित कर्ज

4. हुंड्याची वटवणी

3. पतचलण निर्माण करणे

2. दुय्यम/अनुषंगिक कार्य –

बँकांवर असलेल्या दुय्यम कार्याचे वर्गीकरण प्रतिंनिधीक कार्य व सर्वसाधारण सेवा कार्य असे केले जाते.

A. प्रतिंनिधीक कार्य

B. सर्वसाधारण सेवा कार्य