भारतीय स्टेट बॅंक (State Bank of India)

 

बँक ऑफ बेंगॉल (१८०६), बँक ऑफ बाँम्बे (१८०४) व बँक ऑफ मद्रास (१८४३) या तीन इलाखा बँका (Presidency Banks) स्थापन झाल्या होत्या.

फॉलर चलन समिती (१८९९), चेंबरलीन चलन समिती या समित्यांनी तीन इलाखा बँकांच्या एकत्रिकरणाची शिफारस केली होती.

१९२० ला इंपिरियल बँकेचा कायदा करण्यात आला.

१९२१ ला इंपिरियल बँकेची स्थापना करण्यात आली.

RBI ची स्थापना होईपर्यंत इंपिरियल बँक भारताची मध्यवर्ती बँक म्हणूनही कार्यरत होती. RBI च्या स्थापने नंतर RBI ची प्रतिनिधी, निरसन केंद्र म्हणून कार्य करत आहे.

इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण – इंपिरियल बँकेच्या राष्ट्रीयीकरणाची शिफारस १९५१ च्या भारतीय ग्रामीण पत पुरवठा पाहणी समितीने केली. या समितीचे अध्यक्ष ए. डी. गोरावाला हे होते.

इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्याची कारणे :-

१. बँके वरील परकियांचे वर्चस्व

२. ग्रामीण पत पुरवठ्याविषयी उदासिनवृत्ती

३. अनिष्ट स्पर्धा

४. भारतीय परकीय असा भेदभाव

५. व्यवस्थापनात व सेवेत भारतीयांना वाव नव्हता.

६. भारतीय बँकिंग व्यवसायाची प्रगती घडवून आणणे

भारतीय स्टेट बँक इंडियाची निर्मिती :-
८ मे १९९५ रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट संसदेत संमत झाला.
१ जुलै १९५५ ला इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करुन SBI मध्ये रुपांतर करण्यात आले.

SBI चे मुख्यालय मुंबई येथे आहे.
इंपिरियल बॅंकेच्या भागधारकांना ५०० रु. च्या शेअर्सला १७६५.६२ रु. याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात आली.

भांडवल – SBI च्या एकूण भांडवलात RBI ९२% तर ८% भांडवल भरणा खाजगी व्यक्तीद्वारे करण्यात आला. नुकतेच जुन २००७ मध्ये केंद्र शासनाने नरसिंह समितीच्या शिफारशीने १३०० समभाग १४००० कोटी रुपयांचे स्टेट बँकेमध्ये असलेल्या रिझर्व बँकेचा ५९.७३ टक्के हिस्सा विकत घेतला आहे.

सन १९५९ मध्ये SBI दुय्यम बँका कायदा करण्यात आला. त्यानुसार संस्थानातील बँका SBI ने ताब्यात घेतल्या. या बँकाचे प्रादेशिकत्व कायम ठेवण्यात आले. त्या SBI च्य दुय्यम बँका म्हणून ओळखतात. SBI व दुय्यम बँका याला एकत्रित SBI गट / SBI समुह म्हणून ओळखतात.
सुरुवातीला ८ दुय्यम बँका होत्या. परंतु जाने. १९६३ ला स्टेट बँक ऑफ जयपुर ही स्टेट बँक ऑफ बिकानेर मध्ये विलिन करण्यात आली. व दि. १३ ऑगस्ट २००८ रोजी स्टेट बँक ऑफ सौराष्ट्राचे स्टेट बँकेत विलिनीकरण करण्यात आले. सध्या स्टेट बँकेला ६ दुय्यम बँका आहेत.

त्या पुढील प्रमाणे (BJP HITM)

१. स्टेट बँक ऑफ बिकानेर ऍन्ड जयपुर ( BJ )२) स्टेट बँक ऑफ पतीयाळा (P)

३)स्टेट बँक ऑफ हैद्राबाद (H) ४) स्टेट बँक ऑफ इंदोर ( I )

५) स्टेट बँक ऑफ त्रावणकोर (T) ६) स्टेट बँक ऑफ म्हैसुर (M)
स्टेट बँकेची वैशिष्ट्ये – स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेला सहा उप बँका आहेत
शाखा – शाखांच्या संख्येचा विचार करता SBI चा जगात प्रथम क्रमांक लगतो.

२००९ च्या आकडेवारी नुसार SBI व दुय्यम बँकांच्या शाखा – १६२९४

परदेशात SBI च्या एकूण ३२ देशात ८४ शाखा होत्या. स्टेट बँकेने पहिली परदेशातील शाखा कोलंबो येथे स्थापन केली.
ठेवींमध्ये अनुसुचित बँकांमध्ये SBI चा प्रथम क्रमांक लागतो.