सार्क (SAARC)

 

SAARC :- South Asian Association for Regional Co-Operation

सार्क : हे साउथ एशिअन असोशिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन
स्थापना :- ८ डिसेंबर १९८५
मुख्यालय :- काठमांडू, नेपाळ
सदस्यता :- ८ सदस्य ९ निरिक्षक
अधिकृत भाषा :- इंग्लिश
सरचिटणीस :- अर्जुन बहादुर थापा(डिसेंबर २०१५ )

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (South Asian Association for Regional Cooperation (SAARC); संक्षिप्त नाव: सार्क) ही दक्षिण आशिया खंडामधील ८ देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना आहे. अमेरिका व चीन खालोखाल सार्क सदस्य राष्ट्रांची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच्या २१ टक्के लोक सार्क क्षेत्रामध्ये राहतात. भारत हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे.

सध्या दक्षिण आशियामधील ८ देश सार्कचे सदस्य आहेत. ६ जानेवारी २००६ रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.

सार्कची संकल्पना बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांनी 1977 मध्ये मांडली.

सार्कची पहिली बैठक ढाका येथे झाली, १९८५ च्या सुरुवातीस ७ सदस्य राष्ट्रे होती. भारत , पाकिस्तान , बांगलादेश, नेपाळ , मालदीव , श्रीलंका ,भूतान ही ७ राष्ट्रे होती. नंतर अफगाणिस्तान चा समावेश १३ नोव्हेंबर २००५ रोजी झाला . त्यामुळे आता सदस्य राष्ट्रे 8 आहेत.

आजतागायत संघटनेच्या १८ शिखर परिषदा पार पडल्या आहेत. सार्कच्या सदस्य राष्ट्रांनी नियमित एकत्र येणे अपेक्षित असताना तीस वर्षांत फक्त १८ वेळा ते एकत्र आले, यातून सार्कचे अपयश अधोरेखित होते. २०१६ मध्ये पाकिस्तान येथे होणारी १९ वी शिखर परिषद भारतासह बांग्लादेश, भूतान, अफगाणिस्तान यांनी बहिष्कार टाकल्याने रद्द झाली. याला उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पाश्र्वभूमी होती

सार्क ची १८ वी बैठक नोव्हेंबर २०१४ मध्ये नेपाळ येथे झाली. १९ वी बैठक इस्लामाबाद (पाकिस्तान ) येथे नोव्हेंबर २०१६ मध्ये होणे नियोजित होते. पण उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बैठकीस नकार कळविल्यानंतर बैठक पुढे ढकलण्यात आली.

सार्क चे जनरल सेक्रेटरी म्हणून भारताच्या शिलकांत शर्मा यांचा कार्यकाल फेब्रुवारी २०११ मध्ये संपला. सध्या या पदावर अर्जुन कुमार थापा विराजमान आहेत.

सार्क संघटनेची कल्पना १९५०च्या दशकात Asian Relations Conference मध्ये मूळ धरू लागली. १९७०च्या दशकात बांगलादेश, भूतान, भारत, मालदिव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांनी एकत्रपणे व्यापार व सहकार हेतू एका संस्थेची गरज भासू लागली. दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी सार्क संघटना उभारण्यात आली.