शेअर बाजार

जगातील पहिला शेअर बाजार स्थापन झाला – इग्लंड

भारतातील पहिला रोखे बाजार (शेअर बाजार) मुंबई येथे फेब्रुवारी १८७७ मध्ये स्थापन झाला. या वर्षी मुंबईमध्ये शेअर बाजारासाठी मध्यस्थी करणा-या दलालांनी नेटिव्ह ब्रोकर्स असोसिएशनची स्थापना केले हाच भारतातील पहिला रोखे बाजार होय.

या बाजारास ३१ ऑगस्ट १९५७ रोजी भारत सरकारने मान्यता दिली.

तर १९ऑगस्ट २००५ रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चे पब्लिक लि. कंपनीत रुपांतर करण्या आले.

कापड गिरण्यांना भांडवल पुरवठा करण्यासाठी देशातील दुसरा रोखे बाजार अहमदाबाद येथे १८९४ ला स्थापन झाला. १९०८ मध्ये कोलकाता येथे तिसरा रोखे बाजार स्थापन झाला.

रोखे बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी “दि बॉम्बे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्टस् कंट्रोल ऍक्ट “– १९२५ ला पास करण्यात आला.
१९४५ मध्ये भागबाजारातील तेजी व तिचे दुष्परिणाम, भाग बाजारावर यशस्वी नियंत्रणासाठी यपाय सुचविण्यासाठी भारत सरकारने अर्थ मंत्रालयाचे सल्लागार डॉ. पी.जे.थॉमस यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.

१९५१ च्या ए.डी. गोरवाला यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीच्या आधारे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्टस् रेग्युलेशन ऍक्ट, १९५६ संमत करण्यात आला.

सध्या भारतात २२ शहरात मिळून २३शासनमान्य रोखे बाजार आहेत.

महाराष्ट्र मुंबई व पुणे या दोन शहरात मिळून ५ शासनमान्य रोखे बाजार आहेत.

पुणे शअर बाजार, पुणे (१९८२).

शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपन्यांची संख्या जगात सार्वाधिक भारतात आहे. मार्च२००१ मध्ये ती संख्या ९९८५ इतकी होती. भारतानंतर याबाबत अमेरिका दुस-या क्रमांकावर आहे.

भारतात सर्वाधिक नोंदणीकृत कंपन्या कोलकत्ता शेअर बाजारात असून त्यांची संख्या १९०८ (१९%) तर मुंबई शेअर बाजारात १८२६ (१८%) इतकी होती. (कंसातील आकडेवारी भारतातील एकूण नोंदनीकृत कंपन्यांची टक्केवारी दर्शविते)
१३ मार्च २००७ पर्यंत भारतात ७,४३,६७८ ज्वाईट स्टॉक कंपन्या होत्या. त्यापैकी ६,५३,०२४ कंपन्या खाजगी क्षेत्रात होत्या. तर ९०६५४ सार्वजनिक क्षेत्रात होत्या.

भारतातील कंपन्यापैकी १,६७,०५९ कंपन्या महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी १,४६,८८६ खाजगी क्षेत्रातील तर १२,८४८ सार्वजनिक क्षेत्रातील होत्या.

२००८-२००९ मध्ये देशातील सर्व शेअर बाजाराच्या उलाढालीत एकट्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा वाटा ७१.४३टक्के होता. तर मुंबई शेअर बाजाराचा वाटा २८.५५टक्के होता. तर उर्वरित शेअर बाजारांचा वाटा ०.०२ टक्के होता.

दिल्ली स्टॉक एक्सचेंज ने ऑन लाईन ट्रेडिंग सोबत अत्याधुनिक बँक ऑफीस ट्रेडिंग सिस्टीम सुरु केली त्यामुळे शेअर्स दलाल घर बसल्या व्हि-सॅट कॉम्प्युटर नेटवर्क द्वारे शेअर्स खरेदी विक्री करु शकतील.

सरकारी रोख्यांच्या द्वितीयक बजार विकसित करण्यासाठी मे १९९४ मध्ये केंद्राने स्थापना केली – सेक्यूरीटीज ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया.

 

मुंबईतील शेअर्स बाजार

मुंबई एकूण चार रोखे बाजार आहेत.

१) मुंबई शेअर बाजार, मुंबई(१८७७)

२) ओव्हर दि काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया, मुंबई

३) राष्ट्रीय शेअर बाजार, मुंबई(१९९२)

४) युनायटेड स्टॉक एक्सेचेंज ऑफ इंडिया लि.

ओव्हर दि काउंटर एक्सेचेंज ऑफ इंडिया (OTCEI)

स्थापना- ऑगस्ट १९८९, कार्य सुरु – ६ ऑक्टोंबर १९९२
प्रवर्तक संस्था– आयसीआयसीआय, युटीआय, एसबीआय, एलआयसी, जीआयसी

कार्य- रोखे बाजारात नोंदणी होऊ न शकलेल्या लहान कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्रीचे कार्य करतो.
राष्ट्रीय रोखे बाजार (National Stock Exchange NSE):-
स्थापना -२७ नोव्हेंबर १९९२, कार्य सुरु – नोव्हेंबर १९९४, मुख्यालय – मुंबई
एम.जे. फेरवानी समितीच्या (१९९१) शिफारशी नुसार देशातील १६ बँका व वित्तीय संस्थांनी स्थापन केली.
राष्ट्रीय रोखे बाजारा मधील प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असणा-या भाग बाजाराचे नाव – होलसेल डेट मार्केट
राष्ट्रीय रोखे बाजारातील नवीन कपन्यांच्या रोख्यांचे निर्गमन केले जाते- कॅपिटल मार्केट मध्ये.
देशातील शेअर बाजारातील उत्पादनातील एकट्या एनएसई चा वाटा ७१.४३ टक्के इतका होता.

शेअर निर्देशांक (Sensitivity Index – SENSEX)

सेन्सेक्स – मुंबई शेअर बाजारातील ३० मोठ्या प्रमाणावर उलाढाल करणा-या (लिस्टेड ब्लू चीप कंपन्या) कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीच्या निर्देशांकास सेन्सेक्स म्हणतात.
हा सुचकांक संवेदनशील असल्यामुळे त्याला अर्थव्यवस्थेचा तापमापक अथवा आरसा मानला जातो. भारताच्या शेअर बाजाराच्या एकूण व्यवहारापैकी जास्तीत जास्त व्यवहार एकट्या मुंबई शेअर बाजारात होत असल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजेच BSE हा भारतीय शेअर बाजाराचा मानक (Standard) मानाला जातो. मुंबई शेअर निर्देशांकासाठी १९७८-७९ हे पायाभूत वर्ष ठरविले आहे. व या वर्षीचा शेअर निर्देशांक १००% गृहित धरला आहे.
BSE बँकिंग शेअर्ससाठी मूल्य निर्देशांक १५ जून २००३ पासून सुरु केला त्याला बँकेक्स (BANKEX) असे म्हणतात. यामध्ये १२ बँकांच्या शेअर्सचा निर्देशांक प्रदर्शित करण्यात येतो.
शेअर मुल्यात होणा-या परीवर्तनास परिणामकारक रित्या दाखविण्यासाठी मुंबई शेअर बाजाराने दोन नवीन शेअर मुल्य निर्देशांक सुरु केले – बीएसइ-२०० व डॉलेक्स.
बीएसई २०० चाच डॉलर मधिल निर्देशांक म्हणजे डॉलेक्स होय. बीएसइ -२०० मध्ये २०० निवडक कंपन्यांचा समावेश केला आहे.
या निर्देशांकाचे पायाभूत वर्ष मानले आहे- १९८९ – ९०
बीएसई ने विद्युत क्षेत्रातील १४ कंपन्यांचा २००७ मध्ये सुरु केलेला सुचकांक – बीएसई पॉवर इंडेक्स.
राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) ने एप्रिल १९९६ म्ध्ये एनएसई- १०० च्या जागेवर एनएसई- ५० लॉच केले, यात ५० निवडक शेअर कंपन्याचा समावेश आहे. याचे नवे नाव आता –५एस ऍण्ड पीसीएनएक्स निफ्टी असे आहे.
क्रेडीट रेटींग एजन्सी क्रिसिल (CRISIL) ने ५०० निवडक कंपन्यांचे शेअर मुल्यावर आधारीत नविन शेअर मुल्य निर्देशांक सुरु केला.-CRISIL -५०० यांचे नवे नांव -५एस पीसीएनएक्स-५०० असे आहे.
१८ जानेवारी १९९६ सुरु झालेल्या या निर्देशांकाचे आधार वर्ष – १९९४.