भारतामधील पहिले खाजगी क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प हैदराबादमध्ये
कल्याणी राफेल अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स (KRAS) या भारतामधील पहिल्या खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र उप-प्रणाली निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे.


हैदराबादमधील हा प्रकल्प $२.५ अब्ज गुंतवणुकीसह कल्याणी समूह आणि इस्रायलच्या राफेल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स लि. यांचा संयुक्त उपक्रम आहे. KRAS प्रकल्प अॅंटी-टॅंक गाइडेड मिसाइल (ATGM) स्पाईकचे उत्पादन घेणार.



भारतातील पहिली हेली-टॅक्सी सेवा बंगळूरुमध्ये
नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या हस्ते बेंगळुरूमध्ये हेली-टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे हेलिकॉप्टरद्वारे शहरात टॅक्सीसेवा प्रदान करणारे बेंगळुरू हे देशातील पहिले शहर बनले आहे. 

ही सेवा केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (KIA) आणि इलेक्ट्रॉनिक्स सिटी यांच्या दरम्यान चालवली जाणार आहे. थंबी एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ही सेवा ‘थंबी एव्हिएशन’ या नावाने पुरविणार आहे. 



मोहम्मद मुस्तफा SIDBI चे नवे चेअरमन
भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) चे नवे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून मोहम्मद मुस्तफा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे.

मुस्तफा हे सध्या वित्तीय सेवा विभागात संयुक्त सचिव पदावर कार्यरत आहेत.



श्रीशांतवरील आजन्म बंदी न्यायालयाने हटविली
इंडियन प्रीमिअर लीग’मधील (आयपीएल) सामन्यांमध्ये ‘स्पॉट फिक्‍सिंग’ केल्याच्या आरोपावरून आजन्म बंदी घातलेला एस. श्रीशांतवरील बंदी हटविण्याचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने ‘बीसीसीआय’ला दिला. 

चार वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या ‘स्पॉट फिक्‍सिंग’ प्रकरणात श्रीशांतला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. तत्कालीन ‘राजस्थान रॉयल्स’च्या संघाकडून खेळताना श्रीशांतने हे कृत्य केल्याचा त्याच्यावर आरोप होता. 

या आरोपामुळे २०१३ च्या सप्टेंबरमध्ये श्रीशांतवर ‘बीसीसीआय’ने बंदी घातली होती. त्याच्यासह राजस्थान रॉयल्सचे खेळाडू अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यावरही ही कारवाई झाली होती. 

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मो फराहने १०००० मीटरचे सुवर्णपदक जिंकले
मोहम्मद फराह या धावकाने लंडन (इंग्लंड) मध्ये आयोजित ‘IAAF वर्ल्ड चॅम्पियनशिप २०१७’ स्पर्धेत पुरुषांच्या १०००० मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. 

जागतिक स्पर्धेमधील हे त्याचे सहावे आणि १०००० मिटर शर्यतीतले तिसरे सुवर्णपदक आहे. या विजयासोबतच, ग्रेट ब्रिटनचा अॅथलेट मो फराह हा विक्रमी सलग १० वेळा जागतिक ट्रॅक डिस्टन्स स्पर्धा जिंकणारा पहिला खेळाडू बनला आहे.

IAAF वर्ल्ड चॅम्पियनशिप ही इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन (IAAF) द्वारा १९८३ सालापासून आयोजित केली जाणारी द्वैवार्षिक स्पर्धा आहे.



विजेंदर सिंगने WBO ओरिएंटल, एशिया पॅसिफिक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले
विजेंदर सिंगने WBO ओरिएंटल सुपर मिडिलवेटचे विजेतेपद जिंकले. याशिवाय त्याने WBO एशिया पॅसिफिक सुपर मिडिलवेटचेही विजेतेपद जिंकले.

त्याने ३२ वर्षीय विजेंदरने चीनच्या झुलपीकार मैमैतीयाली याचा पराभव केला. हा त्याच्या व्यावसायिक कारकीर्दीतला नववा विजय आहे.



कसोटी मालिकेत भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला
कोलंबो, श्रीलंका येथे आयोजित भारत-श्रीलंका यांच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करून २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. विजयी आघाडीमुळे भारत या कसोटी मालिकेचा बिनशर्त विजेता ठरला आहे. 



इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून हसन रोहानी यांनी दुसर्‍यांदा शपथ घेतली
इराणचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी पुन्हा एकदा आपल्या दुसर्‍या कार्याकाळासाठी पदाची शपथ घेतली आहे.

इराण हा पर्शियन (अरबी) आखातामधील एक इस्लामिक प्रजासत्ताक देश आहे. 

या देशाची राजधानी तेहरान हे शहर आहे. देशाचे चलन इराणी रियाल आणि अधिकृत भाषा पर्शियन ही आहे.