‘छोडो भारत’ चळवळीला ७५ वर्ष पूर्ण 
९ ऑगस्ट हा भारताच्या स्वातंत्र्यामधील प्रवासाचा एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे.  ९ ऑगस्ट हा क्रांतिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवशी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘चले जाव’ चा नारा लावण्यात आला.


भारत छोडो चळवळ (Quit India Movement), ज्याला ‘भारत ऑगस्ट चळवळ’ म्हणून देखील ओळखतात, ही अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबई सत्रात ८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू करण्यात आलेली नागरी असहकार चळवळ होती. 

समितीचे नेतृत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केले होते. या दिवशी महात्मा गांधी यांनी मुंबई मधील गोवालिया टॅंक मैदानावरच्या त्यांच्या भारत छोडो भाषणात ‘करो या मरो (Do or Die)’ चा नारा दिला.

भारत छोडो आंदोलनातील आक्रमक स्वरूप मिळण्यास प्राथमिक घटक म्हणजे सर स्टाफोर्ड क्रिप्सच्या परती विरोधात बापूंचा निषेध हा होता.



गृहमंत्रालयाने संपूर्ण आसामला AFSPA अंतर्गत ‘अस्थिर’ क्षेत्र घोषित केले
गृहमंत्रालयाने संपूर्ण आसाम राज्याला सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (AFSPA) अंतर्गत एक महिन्यासाठी ‘अस्थिर’ क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. याशिवाय, आसामलगतचा मेघालयाचा सीमावर्ती भाग आणि अरुणाचल प्रदेशातील तीन जिल्ह्यांनादेखील ३ ऑगस्ट २०१७ पासून दोन महिन्यांसाठी AFSPA अंतर्गत ‘अस्थिर’ क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

ULFA, NDFB आणि इतर बंडखोर गटांनी चालविलेल्या विविध हिंसक कारवायांनंतर हा आदेश काढला गेला.



अभिनव बिंद्रा लिखित ‘ए शॉट अॅट हिस्ट्री’ पुस्तकाचे अनावरण
‘ए शॉट अॅट हिस्ट्री: माय ऑबसीव्ह जर्नी टू ऑलिंपिक गोल्ड’ या शीर्षकाच्या पुस्तकाचे अनावरण झाले आहे. या पुस्तकाचे लेखक अभिनव बिंद्रा आणि रोहित ब्रिजनाथ हे आहेत.

भारताला वैयक्तिक स्वरुपात पहिले सुवर्णपदक मिळवून देणार्‍या अभिनव बिंद्रा या नेमबाजाचे २०१२ लंडन ऑलिंपिकमधील अनुभव या पुस्तकात लिहिलेले आहेत



विश्व बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडू टॉप टेनमध्ये 
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि जगात आठव्या क्रमांकाचा खेळाडू किदम्बी श्रीकांत यांना २१ ऑगस्टपासून ग्लास्गो येथे होणार्‍या बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन स्पर्धेसाठी अनुक्रमे चौथे आणि आठवे मानांकन प्राप्त झाले आहे.

विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेची २०१३ आणि २०१४ ची कांस्यपदक विजेती सिंधू हिला ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिन मारिन हिच्यानंतर ठेवण्यात आले आहे. 

२०१५ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवणार्‍या आणि जगातील १६ व्या क्रमांकाच्या भारताच्या सायना नेहवाल हिला १२ वे मानांकन प्राप्त झाले आहे. 

चीन तायपेची जगातील नंबर वन खेळाडू ताइ जू यिंग ही स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे जपानच्या अकाने यामागुची आणि कोरियाची सुंग जी ह्युन यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे मानांकन प्राप्त झाले आहे. 

इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सलग विजेतेपद पटकाविणार्‍या आठव्या मानांकित श्रीकांतचा मानांकनात दोन वेळा ऑलिम्पिक विजेत्या चीनच्या लिन डेननंतर क्रमांक लागतो.
तसेच इतर भारतीयांमध्ये अजय जयराम आणि बी.साई प्रणीत यांना अनुक्रमे १३ व १५ वे मानांकन प्राप्त झाले आहे.

एशियन ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत भारताला २ रौप्य आणि ६ कांस्यपदके मिळाली
फिलीपीन्सच्या प्यर्टो प्रिंसेसा येथे खेळल्या गेलेल्या एशियन ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०१७ स्पर्धेच्या अंती भारताने २ रौप्य आणि ६ कांस्यपदकांची कमाई केली आहे.

रौप्यपदक विजेते : सतेंदर रावत (८०+ किलो) आणि मोहित खताना (८० किलो)

कांस्यपदक विजेते : अंकित नरवाल (५७ किलो), भावेश कट्टामणी (५२ किलो), सिद्धार्थ मलिक (४८ किलो), विनीत दहिया (७५ किलो), अक्षय सिवाच (६० किलो) आणि अमन शेहरावत (७० किलो)



ICC कसोटी क्रिकेट मध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा प्रथम स्थानी
ICC कसोटी क्रिकेट क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजाने प्रथम स्थान प्राप्त केले आहे. जडेजानंतर बांग्लादेशच्या साकिब उल हसन याचा क्रमांक लागतो.

याशिवाय फलंदाजच्या यादीत स्टीव्ह स्मिथ आणि ज्योए रूट यांना अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान तसेच चेतेश्वर पुजाराला तिसरे आणि विराट कोहलीला पाचवे स्थान मिळाले आहे.

गोलंदाजांच्या यादीत रवींद्र जडेजा, जिमी अँडरसन आणि रविचंद्रन अश्विन यांचा प्रथम तीनमध्ये समावेश आहे



९ ऑगस्टला ‘जगातल्या आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा९ ऑगस्ट २०१७ रोजी दरवर्षीप्रमाणे ‘जगातल्या आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यात येत आहे. 

’10th अॅनिवर्सरी ऑफ द यूएन डिक्लेयरेशन ऑन द राइट्स ऑफ इंडिजीनस पीपल्स’ या संकल्पनेखाली हा दिवस यावर्षी साजरा करण्यात येत आहे.

जगभरात ९० देशांमध्ये अंदाजे ३७० दशलक्ष आदिवासी लोक राहतात. त्यांचे प्रमाण जगाच्या लोकसंख्येत ५% पेक्षा कमी आहे, परंतु सर्वात दरिद्री लोकांमध्ये त्यांचे प्रमाण १५% इतके भरते. जगात बोलल्या जात असलेल्या अंदाजे ७००० भाषांपैकी बहुसंख्य भाषा या लोकांकडून बोलल्या जाते आणि शिवाय ते जवळपास ५००० संस्कृतींचे प्रतिनिधित्व करतात.

आजच्या काळात आदिवासी लोक जगातील सर्वात वंचित व संवेदनशील गटांपैकी आहेत. त्यामुळे त्यांच्या अधिकारांचे संरक्षण आणि त्यांची भिन्न संस्कृती आणि जीवनशैली टिकवण्यासाठी प्रयत्न म्हणून त्यांच्याविषयी जागृती आणि समर्थन करण्याकरिता ‘जगातल्या आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस’ हा साजरा केला जातो.

१९९० साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने वर्ष १९९३ ला जगातील आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले.


२३ डिसेंबर १९९४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ठराव ४९/२१४ स्वीकारून दरवर्षी ९ ऑगस्ट या तारखेला ‘जगातल्या आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेतला.

१३ सप्टेंबर २००७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने आदिवासी लोकांच्या अधिकारासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाचा जाहीरनामा अंगिकारला गेला.

भारतात ४६१ जातीय समुदाय ‘अनुसूचित जमाती’ म्हणून ओळखल्या जातात. या समुदायातील लोकांना आदिवासी म्हणून देखील मानले जातात. 

देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८.२% (म्हणजेच अंदाजे ८४.३ दशलक्ष) लोकसंख्या आदिवासी समुदायांची आहे. 

या समुदायाची सर्वाधिक लोकसंख्या ईशान्य भारतामधील सात राज्यांत आढळते आणि त्यामुळे राजस्थान ते पश्चिम बंगाल पर्यंतच्या पट्ट्याला ‘केंद्रीय आदिवासी पट्टा’ म्हणून संबोधले जाते.

या लोकांचे हक्क जपण्याकरिता भारताकडे अनेक कायदे आणि घटनात्मक तरतुदी आहेत, जसे की मुख्य भूप्रदेशात घटनेची पाचवी अनुसूचित आणि ईशान्य भारताच्या काही विशिष्ट क्षेत्रासाठी सहाव्या अनुसूचित या लोकांचे जमिनीचे आणि स्व-प्रशासनाचे हक्क जपले जाते.