भारतीय चलन

१ रुपयाच्या नोटा नाणे त्या पेक्षा कमी मुल्याची नाणे छापण्याचे व उत्तरदायित्व भारतीय अर्थ खात्याचे आहे.

१ रुपयाच्या नोटेवर अर्थ सचिव केंद्रीय अर्थ खाते यांची सही असते.

२ रुपये व त्यापेक्षा किंमतीच्या नोटा छापण्याचा अधिकार RBI चा आहे.

१ रुपयाच्या नाण्यासाठी शुध्द निकेल हा धातु वापरला जातो.

RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख हे होते.

टाकसाळ

भारत सरकारच्या चार टाकसाळ आहेत.

१) मुंबई (१८३०) २) कोलकाता (१९३०) ३) हैद्राबाद (१९५०) ४) नोएडा (१९८९)

टाकसाळ हे नाणे निर्मिती व सोने- चांदीची पारख करण्याचे काम करतात.

भारताची नवी आधुनिक टाकसाळ चेरापल्लीला आहे.

छापकारखाने

करंन्सी नोट प्रेस, नाशिक

या प्रेस मध्ये ५, १०, ५०, १०० ,५०० व १००० च्या मूल्याच्या नोटा छापल्या जातात.

बँक नोट प्रेस, देवास ( म. प्रदेश)

येथे २०, ५०, १००, ५०० च्या किंमतीच्या नोटा छापल्या जातात

या प्रेसमध्ये दोन विभाग आहेत. १) प्रिटिंग प्रेस २) शाई बनविण्याची फॅक्टरी

शाल्विनी (प. बंगाल) आणि म्हैसूर मध्ये RBI नोट मुद्रण ( प्रा. लि.) मध्ये RBI च्या नियंत्रणात करंन्सी नोटा छापल्या जातात.

इंडिया सिक्यूरिटी प्रेस, नाशिक

यामध्ये दोन विभाग आहेत १) स्टॅम्प प्रेस २) सेंट्रल स्टॅप डेपो.

स्टॅप प्रेसमध्ये पोस्टाची सामुग्री, पोस्टाची व इतर तिकिटे, ज्युडिशिअल आणि नॉन ज्युडिशिअल स्टॅप RBI / SBI चे चेक, बाँन्ड, राष्ट्रीय बचत पत्र, इंदिरा विकास पत्र, किसन विकास पत्र, पोस्टल ऑर्डर, पासपोर्ट, प्रॉमिसरी नोट्स, केंद्र सरकार व राज्य सरकारांची प्रतिभूती छापले जाते.

सिक्यूरिटीज प्रिंटिंग प्रेस हैद्राबाद

दक्षिणात्य राज्यांसाठी पोस्ट कार्ड, आंतरदेशीय पत्र, लिफाफे, संपुर्ण देशासाठी केंद्रीय राजस्व स्टॅम्प छापले जातात.( केंद्रीय उत्पादन कराचे तिकीट)

नाशिकच्या प्रेसला मदत म्हणून नॉन ज्युडिशियल स्टॅप छापले जातात.

सिक्यूरीटीज पेपर मिल, हौशिंगाबाद (म. प्रदेश)

येथे करंसी ( चलन ) आणि बँक नोटांचा कागद तसेच इतर सिक्यूरीटीजचा कागद बनविला जातो.

इतर माहिती

गांधीजींच्या चित्राच्या नोटा प्रसिध्द – १९६९,१९८७

नेहरुंचे चित्र चलनी नाण्यावर सर्वप्रथम – १९६४,१९८८

आंबेडकरांचे चित्र असणारे नाणे – १९९१

इंदिरा गांधींचे चित्र असणारे नाणे-१९९२

राजीव गांधीचे चित्र असणारे नाणे-१९९२

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सागर सम्राटच्या ( समुद्रात खनिज तेलासाठी विहीरी खोदणारे जहाज १९ फेब्रुवारी १९७४ कार्यास सुरुवात) अभूतपुर्व कामगिरीचा गौरव म्हणून १ रु. च्या व नवीन १००० रु. च्या नोटेवर सागर सम्राटाची प्रतिकृती छापली आहे.

१००० रु. च्या नोटा २२ वर्षानंतर चलनात आल्या. – ९ ऑक्टोबर २०००

पैशाच्या पुरवठ्याचे मोजमाप

पैसा म्हणजे कोणतीही वस्तु की जिच्याद्वारे सर्व व्यवहारांची पुर्तता करण्यासाठी देणे (ऋण देण्यासाठी) देण्याचे साधन म्हणून जी वस्तू स्विकारली जाते तिला पैसा म्हणतात. अनेक स्थळी अनेक वेळी वेगवेगळ्या वस्तू पैसा म्हणून वापरल्या गेल्या आहेत.

उदा –धान्य, जनावरे, धातू, धातूचे नाणे, कागदी नोटा इ. वापरल्या गेल्या. भारतात सध्या पैशामध्ये नाणी, कागदी चलन व व्यापारी बँकांच्या चालू ठेवींचा समावेश होतो.

१९६७-६८ पर्यंत पैशाच्या पुरवठ्याची एकच एक संकल्पना प्रसिध्दी केली. त्या संकल्पनेला M असे म्हटले गेले. या पैशाच्या पुरवठ्यात (M मध्ये ) लोकांच्या जवळील चलन आणि लोकांच्या व्यापारी बँकातील चालू ठेवी यांचा समावेश केला. या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेला संकुचित संकल्पना असे म्हटले गेले.

१९६७-६८ नंतर मात्र RBI ने पैशाच्या संकुचित संकल्पनेशिवाय पैशाच्या पुरवठ्याची व्यापक संकल्पना प्रसिध्द केली. त्या संकल्पनेला समग्र मौद्रीक संसाधने (M3) असे म्हटले जाते.

मौद्रीक संसाधनामध्ये संकुचित मोजलेला पैसा / संकुचित व्याख्या केलेला पैसा ( म्हणजे चलन आणि चालू ठेवी ) आणि लोकांच्या अधिक व्यापारी बँकांच्या मुदत ठेवी यांचा समावेश समग्र मौद्रीक संसाधने यांच्या मध्ये केला जातो. समग्र मौद्रीक संसाधनाला असे M3 म्हटले आहे.

एप्रिल १९७७ पासून RBI पैशाच्या चार पर्यायी संकल्पनेवर आकडेवारी प्रसिध्द करत आहे. ह्या नवीन संकल्पना M1, M2, M3 आणि M4 असे म्हणटले जाते.

M1 : लोकांकडे असलेले चलन म्हणजे नोटा आणि नाणी, बँकामधील मागणी ठेवी तसेच आरबीआय जवळील इतर ठेवी.

M2 : M1 + लोकांनी पोस्टात ठेवलेल्या बचत ठेवी

M3 : M1 + बँकातील निव्वळ मुदत ठेवी

M4 : M3 + लोकांच्या पोस्ट खात्यात ठेवलेल्या वेगवेगळ्या मुदतीच्या ( बचत ठेवी व्यतिरिक्त) ठेवी ( पोस्ट ऑफीस बचत संघटने जवळील बचत यात राष्ट्रीय बचत पत्राचा समावेश नाही.)

M1 ला संकुचित तर पैसा तर M3 ला व्यापक पैसा संकल्पना म्हणतात. तर M4 हे मुद्रा पुरवण्याचे सर्वात विस्तृत माप आहे. परंतु ते रद्द करण्यात आले आहे