चालू घडामोडी 11.02.2015 to 20.02.2015

* दिल्ली २०१५ विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष ६७ जागा व
५४.०३% मते घेवून विजयी झाला. भाजप ३२.०२% मते व ३ जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला तर कॉंग्रेस ला ९.०७ % मते मिळाली पण एकही जागी विजय नोंदविता आला नाही. 
* अरविंद केजरीवाल यांनी १४ फेब्रुवारी २०१५ रोजी दिल्लीचे ७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 
* अरविंद केजरीवाल यांचा जन्म १६ ऑगस्ट १९६८ रोजी हिसार हरयाणा येथे झाला. 
* आय.आय.टी. खरगपूर येथून मेकैनिकल इंजिनियरिंग ची पदवी प्राप्त करून १९८९ मध्ये टाटा स्टील मध्ये नौकरी केली. 
* १९९२ मध्ये केजरीवाल केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून भारतीय महसूल खात्यात अधिकारी म्हणून नियुक्त झाले. 
* २००६ मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. 
* फेब्रुवारी २००६ मध्ये प्राप्ती कर खात्यातील उपायुक्त पदाचा राजीनामा देवून "पब्लिक कॉज रिसर्च फौंडेशन" ही स्वंयसेवी संस्था सुरु केली. 
* सी. विद्यासागर राव हे महाराष्ट्राचे १८ वे राज्यपाल असून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री आहेत. 
* महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष भाजपचे हरिभाऊ बागडे असून विरोधी पक्ष नेते कॉंग्रेस चे राधाकृष्ण विखे पाटील आहेत. 
* महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कॉंग्रेसचे शिवाजीराव देशमुख असून उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे वसंत डावखरे आहेत व विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आहेत
* १६ फेब्रुवारी २०१५ रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील (रावसाहेब रामराव पाटील) उर्फ आबा यांचे निधन झाले. 
* २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरु झालेल्या पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत भारतात फेब्रुवारी २०१५ पर्यंत १२ कोटी ३१ लाख बैंक खाती उघडली गेली असून, गिनीच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने याची दखल घेतली आहे.