दीपक मिश्रा भारताचे नवे सरन्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा भारताचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. कायदा व न्याय मंत्रालयाने अधिकृतरित्या ही घोषणा केली. विद्यमान सरन्यायाधीश जे.एस. खेहर हे २७ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर दीपक मिश्रा हे त्यांची जागा घेतील.


दीपक मिश्रा यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना याच वर्षी मे महिन्यांत फाशीची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणानंतर ते प्रकाशझोतात आले होते. 

तसेच ६३ वर्षीय दीपक मिश्रा यांची सर्वसामान्यांमध्ये ‘प्रो सिटीझन जज’ अशी ओळख आहे.



ISRO कडून पृथ्वी निरीक्षणासाठी ‘हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटलाइट’ विकसित
भविष्यातील उपग्रहांच्या दृष्टिकोणामधून, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) प्रथमच परिपूर्ण असा ‘हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटलाइट (HySIS)’ विकसित केला आहे. हा उपग्रह सुमारे ६०० किमी दूर अंतराळात पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला जाईल.

उपग्रहाची संरचना स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटर, अहमदाबादने केली आहे आणि इलेक्ट्रॉनिक चिप ISRO च्या सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा, चंदीगड येथे तयार केली आहे.
पृथ्वीचे परिपूर्ण निरीक्षण करण्यासाठी हा उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार आहे. प्रक्षेपण योजना अजून निश्चित नाही.

हायपरस्पेक्ट्रल (hyspex) इमेजिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून ६३० किमी दूरवरून ५५ स्पेक्ट्रल किंवा कलर बँडमधून पाहू शकतो.

ISRO ने विकसित केलेली ‘ऑप्टिकल इमेजिंग डिटेक्टर अॅरे’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर करून हा उपग्रह तयार करण्यात आला आहे. ही चिप १००० x ६६ पिक्सेलमध्येही वाचू शकते.

हा उपग्रहामध्ये प्लेन-व्हॅनिला ऑप्टिकल इमेजर हे उपकरण बसवलेले आहे.उपग्रह लष्करी पाळतीसोबतच पर्यावरण, पिके, तेल आणि खनिजांचा शोध घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

IMS-1 (मे २००८) हा भारताचा पहिला ८३ किलो वजनाचा प्रयोगात्मक उपग्रह होता. चंद्रावरील खनिजांचा शोध घेण्यासाठी २००८ साली चंद्रयान-१ मध्ये हायपरस्केट्रल कॅमेरा बसविण्यात आला.
RISAT-1 आणि 2: ढग आणि अंधारात पाहू शकणारा मायक्रोवेव्ह किंवा रडार इमेजिंग उपग्रह



भारतामधील ब्रिटनची व भारतीय विद्यापीठे ५ सौर ऊर्जा केंद्रे उभारणार
भारतामध्ये कार्यरत असलेल्या ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांसह ब्रिटनची व भारताची १२ विद्यापीठे ५ सौर ऊर्जा केंद्रांची उभारणी करणार आहेत.

दुर्गम भागात या विद्यापीठांना आवश्यक असलेल्या ऊर्जेच्या निर्मितीसाठी ब्रिटनच्या (यूके) सरकारच्या ग्लोबल चॅलेंजेस रिसर्च फंड (GCRF) ने ७ दशलक्ष पाउंडचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे.

हे अनुदान ‘सनराइज’ या नवीन सौर प्रकल्पाचा भाग आहे. ‘सनराइज’ अंतर्गत प्रिंटेड फोटोव्होल्टाइक सेल्स आणि नवीन उत्पादन प्रक्रिया विकसित करून भारतात सौर-उत्पादनांची निर्मिती केल्या जात आहे. यासाठी स्वानसी विद्यापीठाच्या ‘SPECIFIC’ प्रकल्पाचा आधार घेतला जाईल. 



विश्व पोलीस फायर क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णअमेरिकेत सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला दोन सुवर्ण, एक रौप्यपदक मिळाले. त्यात कोल्हापूरच्या जयश्री बोरगी , मुंबईची सोनिया मोकल यांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्ण, तर मुंबईच्याच रवींद्र जगताप याने कुस्तीत रौप्यपदक पटकाविले.

लॉस एंजिल्स येथे सुरू असलेल्या स्पर्धेत जयश्री बोरगी हिने 5 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यापाठोपाठ सोनिया मोकल हिने ८०० मीटर धावणे स्पर्धेत देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. 


तसेच ७१ किलोगटात ग्रीको रोमन प्रकारात मुंबईच्या रवींद्र जगतापने रौप्यपदक मिळवून दिले.

सन २०१५ मध्ये अमेरिकेतील फेअर फॅक्स राज्यातील व्हर्जिनिया येथे झालेल्या स्पर्धेत जयश्री बोरगी हिने ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. 

त्यासह तिने भारतीय पोलीस दलातील धावपटू रहमान याने नोंदविलेला ११:३१:२९ ही विक्रमी वेळही मोडत ११:०३:२१ अशी वेळ नोंदवत ५००० मीटर व १०००० मीटर धावण्यात सुवर्ण, तर ५००० मीटर चालण्यात रौप्यपदकाची कमाई केली होती. 

अशाप्रकारची कामगिरी करणारी ती पोलीस दलातील एकमेव महिला धावपटू ठरली आहे.



रियल मॅड्रिड संघाने ‘२०१७ UEFA युरोपियन सुपर कप’ जिंकले
स्कोप्जे, मॅसिडोनिया येथे रियल मॅड्रिड या फूटबॉल संघाने मँचेस्टर युनायटेड संघाचा पराभव करत ‘२०१७ UEFA युरोपियन सुपर कप’ जिंकले.

रिअल मॅड्रिडचा हा या चार वर्षांतला तिसरा विजय आहे. यापूर्वी, संघाने १९९८, २०००, २००२, २०१४ आणि २०१६ साली युरोपियन सुपर कप जिंकलेला आहे.

UEFA सुपर कप ही युरोपियन फूटबॉल महासंघ (UEFA) द्वारा आयोजित केली जाणारी वार्षिक फुटबॉल स्पर्धा आहे. UEFA चॅम्पियन्स लीग व UEFA युरोपा लीग या दोन मुख्य युरोपियन क्लब स्पर्धांमधील विजेत्या संघांमध्ये ही स्पर्धा खेळली जाते. 



पाकिस्तानच्या ‘मदर तेरेसा ‘डॉ.रुथ फाऊ यांचे निधन
पाकिस्तानमधून कुष्ठरोग दूर करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या जर्मन डॉक्‍टर रुथ फाऊ (वय ८५ वर्षे) यांचे निधन झाले. पाकिस्तानच्या मदर तेरेसा म्हणून त्या प्रसिद्ध होत्या.

डॉ. फाऊ या १९६० मध्ये सर्वप्रथम पाकिस्तानमध्ये आल्या होत्या. येथील कुष्ठरोग्यांची हलाखीची स्थिती पाहून त्या हेलावून गेल्या आणि त्यांनी कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी कायमस्वरूपी पाकिस्तानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. 

नन असलेल्या डॉ. फाऊ यांनी १९६२ मध्ये कराचीमध्ये मारी ऍडलेड लेप्रसी सेंटर स्थापन केले आणि नंतरच्या काळात या संस्थेचा पाकिस्तानात सर्वत्र विस्तार केला. त्यांनी आतापर्यंत पन्नास हजारांहून अधिक कुटुंबांवर उपचार केले आहेत. 

डॉ. फाऊ यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कुष्ठरोगापासून मुक्त होणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने १९९६ मध्ये जाहीर केले.

डॉ. फाऊ यांनी सोसायटी ऑफ डॉटर्स ऑफ हार्ट ऑफ मेरी या संस्थेत प्रवेश केल्यानंतर त्यांना भारतात काम करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, व्हिसासंबंधी अडचण आल्याने त्या काही काळासाठी मध्येच कराचीत उतरल्या होत्या. येथील कुष्ठरोग्यांशी बोलताना त्यांना परिस्थितीची जाणीव झाली आणि त्या कायमस्वरूपी येथेच थांबल्या. 

तसेच त्यांना पाकिस्तानचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला हिलाल ए इम्तियाज १९७९ मध्ये आणि हिलाल ए पाकिस्तान हा पुरस्कार १९८९ मध्ये प्राप्त झाला होता. त्यांना २०१५ मध्ये स्टॉफलर मेडलही प्रदान करण्यात आले होते.



काठमांडूमध्ये १५ वी BIMSTEC मंत्रिस्तरीय बैठक आयोजित
काठमांडू (नेपाळ) येथे १०-११ ऑगस्ट २०१७ रोजी १५ वी BIMSTEC ची मंत्रिस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीमध्ये BIMSTEC सदस्य राष्ट्रांमध्ये आपापसांत मुक्त व्यापार करार तसेच आयात शुल्क कमी करण्याबाबत वाटाघाटी यावर चर्चा करण्यात आली.

बहु-क्षेत्रीय तांत्रिक व आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर पुढाकार (BIMSTEC) हा बांग्लादेश, भूटान, भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या सात देशांचा समूह आहे. 

या सरावामुळे आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी तसेच प्रतिसादाला बळकट करण्यासाठी आणि राष्ट्रांमध्ये आपत्ती व्यवस्थापन समन्वित करण्यासाठी व्यापक पैलूंवर सर्वोत्तम सरावांना सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल.