विजय दिवस १६ डिसेंबर
वर्ष १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध दरम्यान १६ डिसेंबरला भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या दिवसाला चिन्हांकित करण्यासाठी दरवर्षी १६ डिसेंबरला भारतात ‘विजय दिवस’ साजरा करतात.


भारत-पाक युद्धातील पाकिस्तानच्या पराभवानंतर १६ डिसेंबर १९७१ रोजी ढाकामध्ये पाकिस्तानी जनरल ए. के. नियाजी यांनी आपल्या ९३००० पाकिस्तानी सैनिकांसोबत भारतीय कमांडर ले. जनरल जगजीत सिंह अरोडा यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. 

या युद्धात जवळपास ३९०० भारतीय सैनिक शहीद तर ९८५१ जखमी झाले होते.

याशिवाय भारतात दरवर्षी २६ जुलैला ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो. १९९९ साली भारतीय लष्कराच्या सैनिकांनी कारगिल आणि त्याच्या आसपासचा प्रदेश ताब्यात घेऊन ते युद्ध जिंकले होते.



ईशान्य विशेष पायाभूत सुविधा विकास योजना (NESIDS) ला मंजूरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय क्षेत्राची नवी योजना ‘ईशान्य विशेष पायाभूत सुविधा विकास योजना (NESIDS)’ ला शासनाकडून संपूर्ण खर्चासह वर्ष २०१७-१८ पासून सुरू करण्यास त्यांची मंजूरी दिली आहे.

मार्च २०२० पर्यंत निर्दिष्‍ट क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीमधील तफावत भरून काढण्यासाठी ही केंद्र पुरस्कृत योजना सुरू केली जाणार आहे.

NESIDS अंतर्गत पाणीपुरवठा, वीज, संपर्क आणि विशेषकरून पर्यटनाला प्रोत्साहन देणारे प्रकल्प यासंबंधित भौतिक पायाभूत सुविधा तसेच शिक्षण व आरोग्य या सामाजिक क्षेत्रांच्या पायाभूत सुविधा यांचा विकास केला जाणार आहे.



हैदराबादमध्ये कार्यान्वयन समुद्रशास्त्रासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेस मंजूरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने UNESCO च्या श्रेणी-2 केंद्र (C2C) च्या रूपात हैदराबादमध्ये कार्यान्वयन समुद्रशास्त्रासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेस मंजूरी दिली आहे.

हिंद महासागराचे किनारे (IOR), भारतीय व अटलांटिक महासागराशी जुळलेले आफ्रिकेतील देश, UNESCO अंतर्गत येणारे छोट्या बेट राष्ट्रांसाठी क्षमता निर्माणच्या दिशेने प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणे, हा या केंद्राचा उद्देश्य असेल.

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरात स्थित संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. 

या संघटनेची स्थापना १६ नोव्हेंबर १९४५ रोजी लंडन, ब्रिटन येथे करण्यात आली. UNESCO मध्ये १९५ सदस्य राज्ये/राष्ट्रे आहेत आणि १० सहकारी सदस्य आहेत.



मिजोरममधील टयूटियल जलविद्युत प्रकल्प राष्ट्राला समर्पित
मिजोरममधील ६० मेगावॅट क्षमतेचा टयूटियल जलविद्युत प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आला आहे. 

मिजोरममधील हा सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प असून, त्यापासून मिळणारी ऊर्जा या राज्यासाठी वापरली जाणार आहे. १३०२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कार्पोरेशन (NEEPCO) द्वारा उभारण्यात आला आहे.


NGT ने गंगेच्या तीरावरील गावांमध्ये प्लास्टिकच्या वस्तूवर बंदी घातली
राष्ट्रीय हरित प्राधिकरण (NGT) ने गंगा नदीच्या तीरावर वसलेल्या हरिद्वार, ऋषिकेश आदी शहरांमध्ये प्लास्टिकपासून तयार केलेल्या सामानांवर बंदी घातली आहे.

आदेशानुसार या क्षेत्रात प्लास्टिकपासून तयार केलेल्या सामानांचा वापर, विक्री, खरेदी आणि साठवण अश्या कोणत्याही सरावावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये प्लास्टिक पिशव्या, थाळी आणि आदि वस्तूंचा समावेश आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास ५००० रुपयांचा दंड दिला जाईल.

राष्ट्रीय हरित प्राधिकरण (NGT) हे राष्ट्रीय हरित प्राधिकरण अधिनियम-२०१० अंतर्गत स्थापन करण्यात आले आहे. 

पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन या संबंधित कोणत्याही कायदेशीर अधिकाराच्या अंमलबजावणीसह इतर नैसर्गिक स्रोतांच्या संरक्षणाशी संबंधित प्रकरणांची प्रभावीपणे आणि वेगाने विल्हेवाट लावण्यासाह पर्यावरणविषयक वाद हाताळण्यासाठी आवश्यक कौशल्य असलेले हे एक विशेष मंडळ आहे



त्रिपुराच्या चोट्टाखोला येथे भारत-बांग्लादेश ‘मैत्री उद्यान’ लोकांसाठी खुले
त्रिपुरामध्ये दक्षिण भागातील चोट्टाखोला गावात २० हेक्टरच्या भुखंडावर भारत-बांग्लादेश संबंधाना दर्शविणारे ‘मैत्री उद्यान’ आणि एक विशाल स्मारक तयार करण्यात आले आहे. हे उद्यान भारत-बांग्लादेश सीमेपासून केवळ चार किलोमीटरच्या अंतरावर आहे.

१९७१ साली बांग्लादेश स्वातंत्र्य संग्रामामध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या आणि बांग्लादेशच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीत स्मारक आणि मैत्री उद्यान तयार करण्यात आले आहे.



हैदराबादमध्ये ‘जागतिक तेलुगु परिषद’ आयोजित
तेलंगणाच्या हैदराबादमध्ये १५ डिसेंबर २०१७ पासून प्रथम ‘जागतिक तेलुगु परिषद’ या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

पाच दिवस चालणार्‍या या परिषदेत तेलुगु भाषेत निर्माण झालेल्या साहित्य व संस्कृती या विषयांवर चर्चा केली जात आहे. परिषदेचे आयोजन तेलंगणा राज्य शासनाने केले आहे.



युक्रेनमधील आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय मुलींच्या संघाने ८ पदके जिंकली
युक्रेनमध्ये खेळल्या गेलेल्या ‘वेलेरिया डिमेआनोव्हा मेमोरियल इंटरनॅशनल बॉक्सिंग’ स्पर्धेत भारतीय ज्युनियर मुलींच्या संघाने ४ सुवर्णपदकांसह एकूण ८ पदकांची कमाई केली आहे.

या ८ पदकांमध्ये ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि एक कांस्यपदक आहे. भारतीय संघातील अरुंधती चौधरी (६० किलो), राज साहीबा (७० किलो), मितिका संजय (६६ किलो), कोमल (८० किलो) यांनी सुवर्णपदक मिळविले.



जोहान्सबर्ग राष्ट्रकुल कुस्तीत भारताला १० सुवर्णपदके
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या ‘राष्ट्रकुल कुस्ती’ स्पर्धेत भारताने १० सुवर्णपदके आणि १० रौप्यपदकांची कमाई केली आहे.

स्पर्धेच्या ग्रेक्रो रोमन प्रकारात राजेंद्र कुमार (५५ किलो), मनीष (६० किलो), विकास (६३ किलो), अनिल कुमार (६७ किलो), आदित्य कुंडू (७२ किलो), गुरुप्रीत (७७ किलो), हरप्रीत (८२ किलो), सुनील (८७ किलो), हरदीप (९७ किलो), नवीन (१३० किलो) या खेळाडूंनी सुवर्ण पदक जिंकले.

‘राष्ट्रकुल कुस्ती’ अजिंक्यपद ही राष्ट्रकुल समूहातील देशांमधील शीर्ष कुस्तीपटूंसाठी सुरू केलेली स्पर्धा आहे. ही स्पर्धा राष्ट्रकुल खेळाशी संलग्न नाही आणि कोणत्याही देशाच्या कोणत्याही क्रीडा संस्थेकडून अधिकृतता नाही. 



WHO कडून गबॉन देश पोलिओ मुक्त म्हणून घोषित
जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने मध्य आफ्रिकेतील गबॉनला ‘पोलिओ मुक्त देश’ घोषित केले आहे.

पोलिओ हा उच्च असा संक्रामक विषाणूजन्य रोग आहे, जो मुख्यत्वे तरुण मुलांना प्रभावित करतो आणि कायमस्वरूपी अर्धांगवायू होऊ शकतो. यावर कोणताही इलाज नाही आणि केवळ प्रतिरक्षणानंतरच प्रतिबंधित केले जाऊ शकते. 

१९८८ सालापासून पोलिओच्या प्रकरणांमध्ये ९९% कमतरता आली आहे, ज्यावेळी पोलिओ १२५ देशांमध्ये आढळून येत होता आणि त्यावेळी जगभरात पोलिओची ३५०००० प्रकरणे नोंदवली गेली होती. आता केवळ अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येच हा रोग आहे. गेल्या वर्षी पोलिओची ३७ प्रकरणे जगभरात आढळून आलीत.

गबॉन हा मध्य आफ्रिकेमधील अटलांटिक किनारा लाभलेला देश आहे. लिब्रेव्हिल ही देशाची राजधानी आहे. सेंट्रल आफ्रिकन CFA फ्रँक हे देशाचे चलन आहे.