बैलगाडा शर्यतीबाबत उच्च न्यायालयाची बंदी कायम
बैलगाडा शर्यतीबाबत आज (बुधवार) मुंबई येथे उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. राज्य सरकार बैलगाडा शर्यती बाबत नियम अटी प्रसिध्द करु शकते, पण बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्य न्यायालयाने २०१४ च्या निकालात बैल प्राणी पळू शकत नाही, असा निकाल दिलेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालय या बाबत निर्णय देवू शकत नाही, असे म्हणत आज उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यती बंदच ठेवा असे आदेश दिले.




अनुपम खेर यांची ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी नियुक्ती
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अनुपम खेर यांनी चरित्र अभिनेते म्हणून बॉलीवूडमध्ये दीर्घकाळ आपली छाप पाडली आहे. त्यांनी ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून ‘कर्मा’, ‘चायना गेट’, ‘दिलवाले दुल्हनियॉं ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. 

चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी भारत सरकारने खेर यांना २००४ मध्ये पद्मश्री आणि २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवले. खेर यांनी याआधी सेन्सॉर बोर्ड आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्षपदही भूषवले होते. 

यापूर्वी एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान होते. मात्र, सुरुवातीपासूनच ते वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या नियुक्तीला विरोध करत विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले होते. तरीही चौहान पदावर कायम होते. 



नवी दिल्लीत तिसरी आंतरराष्ट्रीय योग परिषद आयोजित
उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांच्या हस्ते १० ऑक्टोबर २०१७ रोजी नवी दिल्लीत दोन दिवसीय ‘निरोगीपणासाठी आंतरराष्ट्रीय योग परिषद’ चे उद्घाटन झाले.

AYUSH राज्यमंत्री श्रीपद यसो नाइक यांच्या अध्यक्षतेखाली आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (AYUSH) मंत्रालयाने या परिषदेचे आयोजन केले आहे. ४४ देशांमधील प्रतिनिधींनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

ही परिषद AYUSH, अॅलोपॅथी चिकित्सक, संशोधक, शिक्षणतज्ञ, धोरण निर्माता आणि विद्यार्थी यांच्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी योगाच्या विविध पैलूंना समजून घेण्यास एक मंच म्हणून काम करते. यापूर्वी सन २०१५ आणि सन २०१६ मध्ये ही परिषद भरवली गेली होती. 



देशात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ सप्ताह पाळला जात आहे
महिला व बालविकास मंत्रालयाकडून देशभरात १० ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०१७ या काळात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ सप्ताह पाळला जात आहे.

‘द डॉटर्स ऑफ न्यू इंडिया’ या संकल्पनेखाली हा सप्ताह पाळला जात आहे. या काळात मुला-मुलींचे प्रमाण आणि मुलींचे महत्त्व समजावून देण्याच्या उद्देशाने राज्य, केंद्रशासित प्रदेश, जिल्हे पातळीवर अनेक अभिनव उपक्रम हाती घेतले गेले आहेत.

जानेवारी २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेमधून कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी निवडण्यात आलेल्या एकूण १६१ जिल्ह्यांपैकी १०४ जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर सुधारण्यात यश आले आहे.



डॉ. बिंदेश्वर पाठक यांना लोक प्रशासनात उत्कृष्टतेचा राष्ट्रीय पुरस्कार
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते डॉ. बिंदेश्वर पाठक यांना २०१७ सालासाठी लोक प्रशासन, शैक्षणिक आणि व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्टतेचा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला.

दिल्लीमधील लालबहादूर शास्त्री व्यवस्थापन संस्था (LBSIM) तर्फे हा पुरस्कार असाधारण व्यावसायिक नेता, व्यवस्थापक, लोक प्रशासक, शिक्षक किंवा संस्था स्थापक अश्या व्यक्तींना दरवर्षी दिला जातो.

डॉ. बिंदेश्वर पाठक यांना समाजात क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी हा पुरस्कार दिला गेला. 

ते सुलभ इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय पातळीवर कमी खर्चाचे आणि सुयोग्य शौचालय तंत्रज्ञान विकसित केले आणि अंमलात आणले आहे, जे सुलभ शौचालय प्रणाली म्हणून लोकप्रिय आहे. त्यांना १९९१ साली पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आलेले आहे. 


सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेला मूलभूत हक्कांमध्ये सामील केले
१० ऑक्टोबर २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. एफ. नरीमन आणि घटनापीठाने एकमताने ‘गोपनीयतेचा हक्क’ याला मानवी मूलभूत हक्कांमध्ये सामील करत ऐतिहासिक आदेश दिला.



नोबेल पुरस्कार २०१७ संपूर्ण 
या वर्षीचा मानसशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रासाठीचा प्रतिष्ठीत १०८ वा नोबेल पुरस्कार जेफरी सी. हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल डब्लू. यंग या तीन अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे. १९०१ साली जर्मन चिकित्सक एमिल वॉन बेहरिंग यांना पहिल्यांदा हा पुरस्कार दिला गेला होता.

भौतिकशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार LIGO डिटेक्टरच्या संशोधनात उल्लेखनीय योगदान देणार्‍या रेनर वेईस, बॅरी सी. बॅरीश, कीप एस. थॉर्न या तीन वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. १०० वर्षांपूर्वी अल्बर्ट आईनस्टाइन यांनी भाकीत केलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या लहरीला LIGO डिटेक्टरच्या सहाय्याने १४ सप्टेंबर २०१५ रोजी प्रथमच शोधण्यात आले होते. 
१९०१ साली विल्हेल्म कॉनरड रोन्टगेन यांना पहिल्यांदा हा पुरस्कार दिला गेला होता.

इंटरनॅशनल कॅम्पेन टु अबोलीश न्यूक्लियर वेपन्स (ICAN) या संस्थेला यंदाचा शांतीसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. १९०१ 
साली फ्रेडरिक पॅसी आणि हेन्री डूनंट यांना पहिल्यांदा हा पुरस्कार दिला गेला होता.

रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा जॅकस डुबोचेट (लुसाने विद्यापीठ, स्वित्झर्लंड), जोकीम फ्रँक (कोलंबिया विद्यापीठ, अमेरिका) आणि रिचर्ड हेंडरसन (MRC लॅबोरेटरी ऑफ मॉलीक्युलर बायोलॉजी, ब्रिटन) या तिघा शास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे. १९०१
 साली जेकोबस हेन्रीकस व्हॅन टी हॉफ यांना पहिल्यांदा हा पुरस्कार दिला गेला होता.

साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार ‘द रिमेन्स ऑफ द डे’ या आपल्या कादंबरीसाठी प्रसिद्ध असलेल्या काझुओ इशिगुरो या ब्रिटीश लेखकाला दिला जात आहे. १९०१
 साली सली प्रुडोमे यांना पहिल्यांदा हा पुरस्कार दिला गेला होता.

अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड एच. थेलर यांना दिला जात आहे. १९६८ 
साली बँक ऑफ स्वीडनद्वारा ‘स्वेरिगेस रिक्स बँक प्राइज इन इकनॉमिक सायन्सेस इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल’ या शीर्षकाने अर्थशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्काराची स्थापना करण्यात आली. १९६९ साली रेग्नर फ्रिच आणि जॅन टिनबर्गन यांना पहिल्यांदा हा पुरस्कार दिला गेला.

नोबेल पुरस्कार हा सन्मान १८६६ साली स्वीडिश उद्योजक आणि संशोधक अल्फ्रेड नोबेल यांनी केलेल्या इच्छेच्या सन्मानार्थ सन १८९५ पासून दिला जात आहे.

सन १९०१ पासून रसायनशास्त्र, साहित्य, शांती, भौतिकशास्त्र, आणि वैद्यकशास्त्र या क्षेत्रांमध्ये नोबेल पुरस्कार दिला जात आहे. त्यानंतर सन १९६८ मध्ये अर्थशास्त्र विषयाला या पुरस्काराच्या श्रेणीत जोडण्यात आले.


भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मानसशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र, साहित्य आणि अर्थशास्त्र यासाठीचा नोबेल पुरस्कार स्टॉकहोम, स्वीडन येथे आयोजित समारंभात देण्यात येतो, तर ओस्लो (नॉर्वे)च्या एका वेगळ्या सोहळ्यात नोबेल शांती पुरस्कार देण्यात येतो.

नोबेल शांती पदकावर ‘Pro pace et fraternitate gentium’ म्हणजेच ‘शांती आणि बंधुतासाठी’ असे वाक्य कोरले जाते.

नोबेल पुरस्कार मरणोत्तर दिले जात नाही आणि एका पुरस्कारासाठी तीनपेक्षा अधिक लोकांची निवड केली जात नाही.

नोबेल पुरस्काराच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एकाच शास्त्रज्ञाला रसायनशास्त्रातील कामगिरीसाठी दोन वेळा नोबेल पुरस्कार दिला गेला आहे आणि ते म्हणजे ब्रिटिश शास्त्रज्ञ फ्रेड्रिक सॅगर (सन १९५८ आणि सन १९८०)

पाकिस्तानी बालशिक्षण कार्यकर्ता मलाला युसुफझाई ला २०१४ साली वयाच्या १७ व्या वर्षी हा पुरस्कार मिळाला, त्यामुळे ती हा पुरस्कार प्राप्त करणारी सर्वात तरुण व्यक्ती आहे.