०१. जपानमधील कुचीनोएराबू जीमा बेट या बेटावर नुकताच मोठय़ा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. हे बेट जपानचे मुख्य दक्षिणी बेट क्यूशू येथील क्यूशू इलेक्ट्रिक पॉवरच्या सेनदई मुख्य संयत्रापासून सुमारे १६० किमी दक्षिणेस आहे. 


०२. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी महिलांच्या वस्त्रांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या  कार्याह या फॅशन पोर्टलमध्ये हिस्सा खरेदी केली आहे. याआधी त्यांनी स्नॅपडील, अर्बन लॅडर, ब्लूस्टोन आण कारदेखो डॉट कॉम यांसारख्या नवख्या ई-कॉमर्समध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. याबरोबरच पेटीएम ही मोबाईल कॉमर्स कंपनी आणि अल्टेरॉस एनर्जीसमध्येही त्यांची गुंतवणूक आहे. दुसरीकडे एप्रिलमध्ये त्यांनी चिनी हँडसेट उत्पादक श्योमीमध्येही गुंतवणूक केली आहे. 


०३. अमेरिकन दूतावासाने व्हिसा नाकारल्यामुळे भारतीय तिरंदाजी संघाने अमेरिकेतील यांकटोन, दक्षिण डाकोटा येथे होणाऱ्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. भारतीय तिरंदाजी संघटनेने (एएआय) अमेरिकेत होणाऱ्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेतून आपला संघच काढून घेतला आहे. केवळ भारतीय तिरंदाजच नव्हेतर तर या संघासोबत प्रवास करणारे कोरियन प्रशिक्षक चे वोन लिम यांनाही अमेरिकन दूतावासाने व्हिसा नाकारला आहे.


०४. भारताच्या २० वर्षांखालील मुलांच्या या संघाला ८ ते १४ जून या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत खेळायचे होते. पण अमेरिकन दूतावासाने केवळ सात मुले, दोन प्रशिक्षक व भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे एक अधिकारी यांचाच व्हिसा मंजूर केला. २१ जणांचा व्हिसा रद्द करण्यात आला. इंग्रजीतून संवाद साधता येत नसल्याने सामनाधीकाऱ्यानी व्हिसा नाकारला आहे.


०५. नेस्ले मॅगीच्या भारतातून होणाऱ्या आयातीवर आणि विक्रीवर नेपाळ व सिंगापूर या दोन देशांनी तात्पुरती बंदी घातली आहे. 


०६. महाराष्ट्र आणि नेदरलॅंडस्‌ द्विपक्षीय करार. महाराष्ट्रातील शेतकर्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करणे, काढणीपश्चात तंत्रज्ञान उपलब्ध करणे, नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला करणे, हरितगृहे याबाबत सहकार्य करणारा द्विपक्षीय करार. नेदरलॅंडस येथील वाणिज्य, व्यापार व विकासमंत्री लिलियन प्लाऊमन व कृषिमंत्री शेरॉन दिस्मा आणि राज्याचे कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांची संयुक्त बैठक झाली. 


०७. मॅगी प्रकरणावरून नेस्ले कंपनीवर कारवाई सुरू असताना आता सरकारी औषध दुकानांमध्ये नेस्लेचे बेबीफूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेरेलॅक या प्रॉडक्टच्या विक्रीलाही बंदी घालण्यात आली आहे. 


०८. स्वस्त दरात जेनेरिक औषधे विक्रीसाठी सरकारतर्फे “जनौषधी‘ दुकाने सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत २०१७  पर्यंत देशभरात तीन हजार दुकाने उघडली जाणार आहेत. आगामी पाच वर्षांत ५० हजार दुकाने देशभरात उघडण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.


०९. भारत-बांगलादेशदरम्यानचा तिस्ता नदीच्या पाणीवाटपाचा मुद्दा अद्याप अनिर्णित असताना बांगलादेशाने अत्रेयी नदीवर धरण उभारल्यामुळे वाद सुरू झाला आहे. अत्रेयी ही तिस्ता नदीची एक उपनदी असून, ती दोन्ही देशांतून वाहते. अत्रेयी नदीवर बांगलादेशाने उभारलेले हे धरण कॉंक्रीटचे असून, आंतरराष्ट्रीय सीमेपासून अडीच किलोमीटवर असलेल्या चिरीबंदर येथे ते आहे. 


१०. या प्रदेशाच्या उपग्रह प्रतिमा पाहताना बांगलादेशाने हे धरण बांधल्याचे भारतीय अधिकाऱ्याना समजले. २०१३-१४ दरम्यान ते बांधले गेल्याचा अंदाज आहे. अत्रेयी नदीचा उगम बांगलादेशात असून, ५८ किलोमीटरच्या प्रवासानंतर दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील बालुरघाट येथे ती भारतात प्रवेश करते. सध्या बालुरघाट येथे ४२ कोटी रुपये खर्च करून ५० लाख लिटर पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्प उभारला जात आहे


११. सोन्याची तस्करी करत असल्याच्या आरोपाखाली एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला  सौदी अरेबियाच्या जेदाह विमानतळ प्रशासनाने ताब्यात घेतले आहे.


१२. मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यामध्ये लष्कराच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये २० जवान हुतात्मा झाले. मोल्तूक खोऱ्यामध्ये ‘सहा-डोग्रा रेजिमेंट’ चे जवान नेहमीप्रमाणे तेंगनौपाल- न्यू समताल रस्त्यावर गस्त घालत होते. या वेळी दहशतवाद्यांनी “आयईडी‘चा स्फोट घडवून आणला, त्यानंतर स्वयंचलित शस्त्रे आणि ग्रेनेडच्या माध्यमातून हल्ला चढविण्यात आला.


१३. मणिपूरमधील “उल्फा‘ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त आहे. मणिपूरचे गृहसचिव जे. सुरेश बाबू यांनी मात्र या हल्ल्यामागे “पीपल्स लिबरेशन आर्मी‘ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्तव केला. चांदेल जिल्ह्यापासून म्यानमारची सीमा केवळ ३९८ किलोमीटर दूर आहे.


१४. राज्य प्राणी शेकरूंची पहिली राज्यस्तरीय प्रगणना संपन्न झाली असून. चांदोलीत ७८, तर कोयनेत तब्बल १८२ असे  सह्याद्रीत एकूण २६० शेकरू आढळले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी एम. एम. पंडितराव यांनी सांगितले, चांदोली व कोयनेच्या प्रत्येकी १९ नियतक्षेत्रात (बीट) ही प्रगणना करण्यात आली.


१५. खारीची दुर्मिळ जात असलेल्या शेकरूची लांबी सामान्य खारीच्या सुमारे चार ते पाच पट असते. त्याचे आयुष्यमान दहा ते बारा वर्षांचे असते. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत प्रवास करणारे हे शेकरू सहसा जमिनीवर उतरत नाही. एका वेळी वीस फुटांपर्यंत लांब उडी ते मारू शकते. उंच झाडाच्या सर्वाधिक उंच फांदीवर ते आपले घरटे बांधते.


१६. आण्विक पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सभासदत्वासाठी पाकिस्तानला चीन ने पाठिंबा दिला आहे.


१७. ई-कॉमर्स सेवा पुरवणाऱ्या ‘स्कॅवा‘ या कंपनीचे इन्फोसिसने संपादन केले आहे. इन्फोसिसने एप्रिलमध्ये ‘स्कॅवा‘ कंपनीचे संपादन करण्यासाठी करार केला होता. हा करार सुमारे १२ कोटी अमेरिकी डॉलर्सला करण्यात आला आहे. इन्फोसिसने ‘कॅलैडस इन्क‘चे पूर्णपणे अधिग्रहण केल्याचे सांगितले आहे. ‘स्कॅवा‘ होल्डिंग गटातील कंपनी आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी इन्फोसिसने सुमारे १२५० कोटी रुपयांना ‘पनया‘चे अधिग्रहण केले होते.


१८. एस. वेंकटराघवन यांच्या निवृत्तीनंतर तब्बल ११  वर्षांनी आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये तमिळनाडूच्या एस. रवी या भारतीय पंचाला स्थान मिळाले आहे. एलिट पॅनेलमधील पंच : आलिम दर (पाकिस्तान), कुमार धर्मसेना (श्रीलंका), मॅरीयूस इरॅस्मस (दक्षिण आफ्रिका), ख्रिस गॅफनी (न्यूझीलंड), इयन गौल्ड, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबर्ग, नायजेल लॉंग (इंग्लंड), एस. रवी (भारत), पॉल रायफेल, रॉड टकर, ब्रूस ऑक्सेगनफोर्ड (ऑस्ट्रेलिया).


१९. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या क्रिकेटपटूंसाठी आयोजित करण्यात येणार्या मास्टर्स चॅंपियन्स लीग टी २० क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद संयुक्त अरब अमिरातीला देण्यात आले आहे. पहिली स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होईल. मास्टर्स लीगला अमिराती क्रिकेट मंडळाकडून दहा वर्षांसाठी मान्यता मिळाली आहे. 


२०. त्यानुसार पहिल्या वर्षी ही दोन आठवडे चालणारी स्पर्धा दुबई, अबुधाबी आणि शारजा येथे खेळविली जाईल.या लीगचे कार्याध्यक्ष झफर शाह आहेत. या लीगमध्ये ६ संघ असतील. तसेच प्रत्येक संघात १५ खेळाडू असतील. अशा प्रकारे एकूण ९० खेळाडू
स्पर्धेत भाग घेतील. 


२१. भारत अ आणि १९ वर्षांखालील भारतीय संघ या दोन्ही संघाचे प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे सोपविण्यात आले आहे. 


२२. बांगलादेशातील विजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी अदानी पॉवर आणि रिलायन्स पॉवर तब्बल ४६०० मेगावॅट विजनिर्मिती करणार आहे. पहिला करार अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स पॉवर आणि बीपीडीबीदरम्यान झाला. या करारानुसार रिलायन्स कंपनी बांगलादेशात चार ठिकाणी वीजनिर्मिती प्रकल्प उभारून तीन हजार मेगावॅट वीज तयार करेल. याला तीन अब्ज डॉलर (२०० अब्ज रुपये) खर्च अपेक्षित आहे.


२३. अदानी पॉवर आणि बीपीडीबीदरम्यान वीजनिर्मितीबाबत एक करार करण्यात आला आहे. अदानींच्या प्रकल्पातून १६०० मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार असून कंपनी कोळसा आधारित प्रकल्पांची उभारणी करणार आहे. या प्रकल्पाला दीड अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे.


२४. टीम इंडिया व दक्षिण आफ्रिका संघात गांधी-मंडेला क्रिकेट मालिका आयोजित करण्याचा प्रस्ताव बीसीसीआयकडे आला असून, त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 


२५. वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन भारतातून अमेरिकेत वास्तव्यास गेल्या आहेत. अल-कायदाशी संबंधित इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनी अविजित रॉय, वशिकुर रेहमान आणि अनंदबिजॉय दास या ब्लॉगरच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. त्यांनीच तस्लिमा नसरीन यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. १९९४पासून ५२ वर्षीय तसलीमा नसरीन बांगलादेशबाहेर राहत आहेत. त्या सध्या स्वीडनच्या नागरिक असून त्यांना २००४पासून नियमितपणे भारताचा व्हिसा मिळत आला आहे.