‘प्रथम’ उपग्रहाचे प्रक्षेपण

०१. मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रथम या उपग्रहाचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. प्रथम या उपग्रहामुळे विद्यूत परमाणू मोजता येणार असून त्यामुळे जीपीएस प्रणाली आणखी सक्षम होण्यास मदत होणार आहे. अंतराळात झेपावलेला प्रथम हा सातवा विद्यार्थी उपग्रह आहे.

०२. विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान संशोधनात रस निर्माण व्हावा या उद्देशाने ‘इस्रो’ने विद्यार्थी उपग्रह योजना सुरू केली होती. आयआयटी मुंबईत शिकत असलेल्या सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तामसकर या दोन विद्यार्थ्यांनी २००७ मध्ये प्रथम या उपग्रहाची संकल्पना मांडली. यानंतर २००९ मध्ये आयआयटी मुंबई आणि इस्रोमध्ये सामंजस्य करार झाला. 

०३. नऊ वर्षांच्या वाटचालीनंतर सोमवारी हा उपग्रह अवकाशात झेपावले.
इस्त्रोच्या पीएसएलव्ही सी ३५ या प्रक्षेपकाने श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात झेप घेतली. 

०४. ३२० टनचे पीएसएलव्ही सी ३५ हे प्रक्षेपक आठ उपग्रहांसह अवकाशात झेपावले. आठ उपग्रहांमध्ये भारताचे तीन, अमेरिका आणि कॅनडाचे प्रत्येकी एक तर अल्जेरियाच्या तीन उपग्रहाचा समावेश आहे. 

०५. भारताच्या तीन पैकी स्कॅटसॅट १ हा एक भारतीय उपग्रह असणार आहे. या उपग्रहाचे वजन ३७१ किलोग्रॅम असेल. या उपग्रहांमुळे सागरी तसेच हवामानसंबंधीच्या अभ्यासात मदत होणार आहे. तर मुंबई आयआयटीचे प्रथम या १० किलोचे आणि बेंगळुरुच्या पीएसई महाविद्यालयाच्या एका उपग्रहाचाही यामध्ये समावेश आहे. अल्जेरियाच्या अल्सेट १ बी, अल्सेट २ बी आणि अल्सेट १ एन या तीन उपग्रहांचाही यात समावेश आहे. 



रेल्वेच्या विश्रांतीकक्षाचा कायापालट
०१. देशातील रेल्वेसेवेचा कायापालट करण्याच्या प्रक्रियेतील एक भाग म्हणून आता प्रत्येक रेल्वेस्थानकांवरील विश्रांतीकक्षात आणि डॉर्मेट्रीमध्ये अलिशान सुखसुविधा देण्यात येणार आहेत. त्यासाठीच जवळपास सर्वच रेल्वेस्थानकांवरील विश्रांतीकक्षांचे व्यवस्थापन ‘इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन’कडे (आयआरसीटीसी) सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

०२. पहिल्या टप्प्यात एकूण ६०० रेल्वेस्थानकांवरील विश्रांतीकक्षांचे आणि डॉर्मेट्रींचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरणाऱ्या ग्राहकांना ज्या पद्धतीच्या सुविधा पुरविल्या जातात. त्याच स्वरुपाच्या सुविधा विश्रांतीकक्षात येणाऱ्या प्रवाशांना मिळतील



स्कॅटसॅट-१ या उपग्रहाचे प्रक्षेपण
०१. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पीएसएलव्ही सी-३५ या प्रक्षेपकाच्या मदतीने स्कॅटसॅट-१ या हवामान उपग्रहासह आठ उपग्रह सोमवारी अवकाशात सोडून एक नवा इतिहास लिहिला. अवकाशयानाने आत्तापर्यंत सर्वाधिक लांबचे उड्डाण केल्याने इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

०२. पीएसएलव्ही सी-३५ हे ४४.४ मीटर उंचीचे अवकाशयान येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सोमवारी सकाळी ठीक ९.१२ वाजता अवकाशात झेपावले. स्कॅटसॅट १ हा ३७१ किलो वजनाचा उपग्रह १७ मिनिटांत ७५० किमीच्या सूर्यसापेक्ष कक्षेत सोडण्यात आला. इतर उपग्रहही दोन तास १५ मिनिटांत अवकाशात सोडण्यात आले. 

०३. उपग्रहांचे वजन ६७५ किलो होते. उपग्रह वेगवेगळ्या कक्षांत प्रस्थापित करण्यासाठी चार टप्प्यांच्या दोन इंजिनांचा वापर करण्यात आला. या कक्षांमध्ये एक किमीचा फरक होता. ही मोहीम पूर्ण करण्यास २ तास १५ मिनिटे ३३ सेकंद एवढा कालावधी लागला.

०४. स्कॅटसॅट १ हा ओशनसॅट १ स्कॅटरोमीटर मोहिमेतील पूरक उपग्रह आहे. हवामान अंदाज, चक्रीवादळ अंदाज या उपग्रहाद्वारे मिळतील. या उपग्रहाचे आयुर्मान पाच वर्षे आहे.

०५. आयआयटी मुंबईचा ‘प्रथम’, बंगळुरूच्या बीईएस विद्यापीठाचा ‘पीसॅट’ हे उपग्रहही अवकाशात सोडण्यात आले. प्रथमचा उद्देश ‘टोटल इलेक्ट्रॉन काऊंट’ हा असून, ‘पीसॅट’ हा दूरसंवेदन प्रकारातील नॅनो उपग्रह आहे.


०६. अलसॅट १ एन हा विद्यार्थ्यांनी तयार केलेला तंत्रज्ञान उपग्रह आहे. पाथफाइंडर १ हा अमेरिकेचा अधिक विवर्तन शक्ती असलेला उपग्रह आहे.
कॅनडाचा एनएलएस १९ हा तंत्रज्ञान उपग्रह अवकाशातील कचरा कमी करण्यासाठी व व्यावसायिक विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर होणार आहे.

०७. या मोहिमेला दोन तासांहून अधिक काळ लागला. कमी गुरुत्वात उपग्रह वेगवेगळ्या कक्षांत सोडण्यात आले. त्यासाठी अवकाशात इंजिन दोनदा प्रज्वलित करावे लागले. 
प्रक्षेपक व उपग्रह यांची वातावरणातील घर्षणामुळे होणारी हानी टाळण्यासाठी उष्णतारोधक कवच वापरण्यात आले.

०८. पीएसएलव्हीचे इंजिन एक तासात दुसऱ्यांदा सुरू करण्यात आले. प्रक्षेपक-इंजिन या मधल्या काळात थंड होऊ द्यावे लागते. एकाच वेळी असे करणे अवघड असते.

०९. इस्रो ऑक्टोबरमध्ये ‘जीसॅट १८’ हा उपग्रह सोडणार आहे. तसेच ‘जीएसएलव्ही मार्क ३’ या वर्षांच्या अखेपर्यंत सोडण्यात येणार आहे. ‘रिसोर्ससॅट २ ए’ हा उपग्रह नोव्हेंबरमध्ये अवकाशात सोडण्याचे इस्रोचे लक्ष्य आहे.


‘स्कॅटसॅट-१’ (भारताचा हवामान उपग्रह – ३७१ किलो) 
‘प्रथम’ (मुंबई आयआयटी विद्यार्थ्यांनी घडवलेला उपग्रह – १० किलो
‘पीसॅट’ (बंगळुरू येथील बीएसई विद्यापीठ – ५.२५ किलो)
‘अलसॅट-१ बी’, ‘अलसॅट-२ बी’, ‘अलसॅट-१ एन’ (अल्जेरिया) 
‘पाथफाइंडर-१’ (अमेरिका)
‘एनएलएस-१९’ (कॅनडा)

१०. आजच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे इस्रोने एकाचवेळी दोन कक्षांत उपग्रह सोडण्याची क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे इस्रोला यापुढे आणखी व्यावसायिक फायदा होईल.



उत्तर प्रदेश पोलीस दल सर्वात हायटेक बनणार
०१. देशातील सर्वांत हायटेक पोलिस दल बनण्याकडे उत्तर प्रदेश पोलिसांची वाटचाल सुरू आहे. या पोलिस दलाने नुकतेच राज्यातील तब्बल बारा लाख ठिकाणांचे जिओ टॅगिंग पूर्ण केले आहे. यामुळे १०० या क्रमांकाचा उपयोग करून मदत मागणाऱ्या नागरिकाचे ठिकाण तत्काळ नियंत्रण कक्षाला समजून वेगाने मदत पुरविता येणार आहे. 

०२. एखाद्या ठिकाणाची भौगोलिक माहिती इंटरनेटवर अथवा एखाद्या ऍपवर अपलोड करणे याला जिओ टॅगिंग म्हणतात. यामध्ये त्या ठिकाणाचे अक्षांश, रेखांश, अंतर, नाव ही प्रमुख माहिती अंतर्भूत असते. यामुळे एखाद्या रस्त्याच्या नावावरून, जवळच्या खुणांवरून अथवा छायाचित्रावरून त्याची निश्‍चित जागा शोधता येते. 

०३. ठिकाणांची वर्गवारी करताना ६० विभाग पाडण्यात आले असून मंदिर, मशीद, चर्च, शाळा, चौक, दारूची दुकाने अशा प्रकारचे हे विभाग आहेत. 

०४. जिओ टॅगिंग करण्यासाठी यूपी-१०० जीआयएस (ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम) ऍप्लिकेशनचा वापर करण्यात आला. हे ऍप्लिकेशन केवळ पोलिसांसाठीच तयार केले गेले असून जमा केलेली माहिती कोणालाही दिली जाणार नाही. 

०५. राज्यातील निवडक १३५०० पोलिसांनी आपापल्या हद्दीत सर्वेक्षण करून ती माहिती या ऍपमध्ये अपलोड केली आहे. यामुळे अडचणीत असलेल्या नागरिकाने १०० क्रमांकाचा वापर करून पोलिसांशी संपर्क साधल्यास तो त्या वेळी असलेले ठिकाण आणि नजीकचे महत्त्वाचे ठिकाण नियंत्रण कक्षाला समजून तातडीने मदत पुरविणे शक्‍य होणार आहे. या माहितीच्या साह्याने पोलिस ठाण्यांची हद्दही निश्‍चित केली जाणार आहे. 





चीनची महादुर्बीण कार्यरत
०१. चीनने जगातील सगळ्यात मोठ्या व प्रचंड आकाराच्या रेडिओ दुर्बीणचा वापर सुरू केला. फुटबॉलची ३० मैदाने एकत्र केल्यावर जेवढा आकार होईल तेवढी ही दुर्बीण असून ती ४४५० परावर्तक आरशांपासून (रिफ्लेक्टर पॅनेल्स) बनलेली आहे. 

०२. तसेच या विश्वाचा जन्म वा उत्पत्ती कशी झाली आणि पृथ्वीच्या बाहेरील जीवनाचा शोध घेण्यास ही दुर्बीण मदत करील.चीनच्या अकॅडमी ऑफ सायन्सेस अंतर्गत काम करणाऱ्या नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनोमिकल ऑब्झर्वेशनचे उप प्रमुख झेंग शिओनियन यांनी ही माहिती सांगितली.

०३. गुईझोऊ प्रांतातील पिंगटॅँग परगण्यातील कार्स्ट खोऱ्यात ही दुर्बीण आहे. हा दुर्बीण प्रकल्प २०११ मध्ये सुरू झाला व त्यासाठी १.२ अब्ज युआन (१८० दशलक्ष अमेरिकन डॉलर) खर्च आला.